शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्लॅकमेल करणाऱ्या प्रेयसीचा खून, मृतदेह दौलताबाद घाटात फेकून प्रियकर पोलिस ठाण्यात हजर
2
"आम्ही ओबीसींच्या हिताचं रक्षण करू शकलो नाही", राहुल गांधींनी चूक मान्य केली; आता दिलं मोठं आश्वासन
3
चालत गेली अन् शाळेच्या चौथ्या मजल्यावरून मारली उडी; दहावीतील विद्यार्थिनीचा व्हिडीओ आला समोर
4
"नरेंद्र मोदी मोठी समस्या नाहीत, त्यांच्यात ..."; विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांचा मोठा हल्ला!
5
मुंबई लोकलमध्ये ६२ कोटी रुपयांचे मोबाईल चोरीला; किती लोकांना परत मिळाले? 
6
‘५६ लाख घुसखोर आले कसे? तुम्ही राजीनामाच द्या’, महुआ मोईत्रांनी अमित शाहांना सुनावले  
7
Bank Job 2025: बँक ऑफ बडोदामध्ये मॅनेजर, सिनियर मॅनेजर पदांसाठी भरती; संधी सोडू नका!
8
'एक नंबर'! 'लोकमत डॉट कॉम'सोबत वाचकांची 'महायुती'; ६,२१,५३,००० 'लोकमतां'सह घेतली 'महाआघाडी'
9
फहाद फासिलनं सांगितले त्याचे आवडते '५' चित्रपट, तुम्ही पाहिलेत का?
10
पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारायला तयार; मंत्रि‍पदाच्या चर्चांवर राहुल नार्वेकरांचे सूचक विधान
11
एक दोन नाही तर २५००० कर्मचाऱ्यांची कपात होणार, एप्रिलनंतर आता पुन्हा एकदा Intel च्या कर्मचाऱ्यांवर संकट
12
"...हे विरोधी पक्ष ठरवू शकत नाही"; लोकसभेत प्रचंड गोंधळ, कोणत्या मुद्द्यावर केंद्रीय मंत्री भडकले?
13
'माझ्या मनावर ओझं पण...' ९००० कर्मचाऱ्यांना काढल्यानंतर सत्या नाडेला यांनी अखेर मौन सोडले; म्हणाले...
14
सरकार आता आमची गेलेली मुलं परत आणून देऊ शकतं का? शाळा दुर्घटनेनंतर पालकांचा आक्रोश
15
31 जुलैपासून सुरू होणार 'या' कंपनीचा कार प्लांट, दर वर्षी बाहेर पडणार 1.50 लाख इलेक्ट्रिक कार!
16
'ऑपरेशन सिंदूर' अजून संपले नाही; CDS जनरल अनिल चौहान यांचे मोठे विधान
17
Sex Racket: फाइव्ह स्टार हॉटेल आणि हाय- प्रोफाइल विदेशी महिला; मुंबईतील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश!
18
Shravan 2025: पौराणिक कथांच्या शेवटी 'साठा उत्तराची कहाणी... सुफळ संपूर्ण' असं का म्हणतात?
19
तुमच्या PF खात्यात पैसे नसले तरीही नॉमिनीला आता थेट ५०,००० मिळतील; EPFO ने 'हे' नियम बदलले
20
Walmik Karad : 'धनंजय मुंडेंना संपवून वाल्मिक कराडला पोटनिवडणूक घ्यायची होती'; बाळा बांगरांचा गंभीर आरोप

आधी आईनं गळा आवळला, त्यानंतर मामानं...; बारावीत शिकणाऱ्या मुलीसोबत घडलं भयंकर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2025 15:23 IST

Uttar Pradesh Crime: उत्तर प्रदेशच्या मेरठ जिल्ह्यातून खळबळजनक प्रकार समोर आला.

उत्तर प्रदेशच्या मेरठ जिल्ह्यातून खळबळजनक घटना समोर आली. फोनवर बोलण्याच्या वादातून एका महिलेने पोटच्या मुलीची गळा आवळून हत्या केली. त्यानंतर मृतदेहाचे शिर धडावेगळे केले आणि धड आणि शिर दोन वेगवेगळ्या ठिकाणी फेकून दिले. याप्रकरणी पोलिसांनी मृताची आई, मामासह कुटुंबातील इतर सदस्यांना अटक करण्यात आली. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत

मिळालेल्या माहितीनुसार, आस्था उर्फ ​​तनिष्का असे हत्या झालेल्या मुलीचे नाव असून ती इयत्ता बारावीत शिकत होती. घटनेच्या दिवशी आस्था फोनवर तिच्या मित्राशी बोलत होती. हे पाहिल्यानंतर आस्थाची आई संतापली. त्यानंतर आस्थाच्या आईने तिच्या हातातून मोबाईल हिसकावून घेतला. मात्र, त्यानंतर दोघांमध्ये वाद सुरू झाला. हा वाद इतका पेटला की, रागाच्या भरात आस्थाच्या आईने तिची गळा आवळून हत्या केली. त्यानंतर आस्थाच्या मामाने तिचे शिर धडावेगळे केले आणि धड आणि शिर दोन वेगवेगळ्या ठिकाणी फेकून दिले. 

निर्जनस्थळी मृतदेह आढळल्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तपासादरम्यान, पोलिसांना आस्थाच्या खिश्यात एक मोबाईल नंबर साडपला. पोलिसांनी ताबडतोब त्या नंबरवर फोन करून मृतदेहाची ओळख पटवली. त्यानंतर पोलिसांनी आस्थाच्या कुटुंबाची भेट घेतली. त्यावेळी आस्थाच्या आईने त्यांची मुलगी बेपत्ता असल्याचे नाटक केले. परंतु, पोलिसांना आस्थाच्या आईचे बोलणे संशयास्पद वाटल्याने त्यांनी तिची कसून चौकशी केली. सुरुवातीला तिने उडवाउडवीचे उत्तर दिले. मात्र, पोलिसांनी खाक्या दाखवताच तिने मुलीच्या हत्येची कबूली दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आस्थाची हत्या केल्यानंतर तिच्या आईने मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा कट रचला. पोलिसांपासून वाचण्यासाठी आस्थाच्या मामाने मृतदेहाचे शिर धडापासून वेगळे केले आणि नातेवाईकांच्या मदतीने दोन वेगवेगळ्या ठिकाणी फेकून दिले. आस्थाचे धड बहादूरपूर येथील एका कालवण्यात आणि शिर जवळच्या एका नाल्यात फेकण्यात आले. याप्रकरणी आस्थाची आई, मामा आणि इतर नातेवाईकांना पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेश