...अन् हसतं खेळतं घर उद्धवस्त झालं! आई-बाबांसह मुलं झोपली; 'ती' एक चूक जीवावर बेतली
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2023 14:53 IST2023-01-09T14:52:53+5:302023-01-09T14:53:14+5:30
उत्तर प्रदेशमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एक हसतं खेळतं कुटुंब उद्ध्वस्त झालं आहे.

...अन् हसतं खेळतं घर उद्धवस्त झालं! आई-बाबांसह मुलं झोपली; 'ती' एक चूक जीवावर बेतली
उत्तर प्रदेशमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एक हसतं खेळतं कुटुंब उद्ध्वस्त झालं आहे. रविवारी रात्री घरात गॅस हिटर चालू ठेवल्याने झोपेतच एका कुटुंबातील चार जणांचा गुदमरून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी एका दूधवाल्याने झज्जर परिसरातील कुटुंबाच्या घराचा दरवाजा ठोठावला तेव्हा ही बाब उघडकीस आली.
गॅस हिटरमुळे गुदमरून मृत्यू
मृतांमध्ये स्थानिक मदरशात क्लार्क म्हणून काम करणारा आसिफ (35), त्याची पत्नी शगुफ्ता (32) आणि त्यांची दोन मुले जैद (3) आणि मायरा (2) यांचा समावेश आहे. हे सर्वजण शनिवारी रात्री आपल्या खोलीत गॅस हिटर लावून झोपायला गेले होते. गॅस हिटरमुळे गुदमरून सर्वांचा मृत्यू झाल्याची माहिती सर्कल ऑफिसर बिस्वा अभिषेक प्रताप यांनी दिली आहे.
डॉक्टरांनी सर्वांना केले मृत घोषित
रविवारी सकाळी घराचे गेट न उघडल्याने शेजाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून घराचा दरवाजा तोडला असता घरातील सर्व सदस्य बेडवर बेशुद्धावस्थेत पडलेले दिसले. त्यानंतर त्यांना रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी सर्वांना मृत घोषित केले. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"