उत्तर प्रदेशातील देवरिया जिल्ह्यातील रामपूर कारखाना पोलीस स्टेशन परिसरातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथे मोमोज खाऊ घालण्याच्या बहाण्याने इयत्ता ७ वीत शिकणाऱ्या एका मुलाला भुरळ घालून, तीन तरुणांनी त्याच्या घरातील लाखो रुपयांचे दागिने हडपले. ही संपूर्ण घटना भगवानपूर तिवारी गावाची असून कुटुंबाने पोलिसांत तक्रार दाखल करून आरोपींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
मुलाचे वडील विमलेश मिश्र हे वाराणसीमधील एका मंदिरात पुजारी आहेत. त्यांनी सांगितलं की, त्यांच्या मुलाला मोमोज खाण्याची प्रचंड आवड आहे. त्याच्या याच कमकुवतपणाचा फायदा घेत देवरिया-कसया मार्गावरील डुमरी चौकात मोमोजचे दुकान लावणाऱ्या तीन तरुणांनी मुलाला हळूहळू आपल्या जाळ्यात ओढलं. वडिलांच्या म्हणण्यानुसार, आरोपी अनेक दिवसांपासून मुलाला मोमोज खाऊ घालायचे आणि नंतर त्याला फूस लावून घरून दागिने आणायला सांगायचे.
प्रकरणाचा खुलासा कसा झाला?
पुजारी विमलेश मिश्र यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या घरात त्यांचे स्वतःचे आणि त्यांच्या बहिणीचे मिळून सुमारे ८५ लाख रुपयांचे दागिने ठेवले होते. जेव्हा त्यांची बहीण काही कामासाठी तिचे दागिने नेण्यास आली आणि तिने कपाट उघडले, तेव्हा सर्वांना मोठा धक्काच बसला. कपाटातील जवळपास सर्वच दागिने गायब होते. घाबरलेल्या वडिलांनी जेव्हा मुलाकडे चौकशी केली, तेव्हा त्याने सांगितले की मोमोज खाण्याच्या बदल्यात त्याने हे दागिने डुमरी चौकातील दुकानदारांना दिले आहेत.
तिघांविरुद्ध तक्रार दाखल
या खुलाशानंतर कुटुंबाने तीन संशयित तरुणांविरुद्ध रामपूर कारखाना पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दिली आहे. पोलिसांनी या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून तपास सुरू केला आहे. आरोपींची भूमिका, मुलाला फसवण्याची पद्धत आणि चोरीला गेलेल्या दागिन्यांचे नेमके कोणते आहेत याची चौकशी केली जात आहे.
या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. इतक्या लहान मुलाला इतक्या दीर्घकाळ फसवून एवढी मोठी लूट कशी केली गेली, असा सवाल लोक उपस्थित करत आहेत. पोलीस आता सीसीटीव्ही आणि स्थानिक पुराव्यांच्या आधारे या प्रकरणाचा छडा लावण्याचा प्रयत्न करत आहेत.
Web Summary : In Uttar Pradesh, a 7th-grade boy, lured by momos, gave away ₹85 lakh worth of family jewelry to shopkeepers. The boy's weakness was exploited by three individuals, who are now under police investigation following a family complaint.
Web Summary : उत्तर प्रदेश में मोमोज के लालच में एक 7वीं कक्षा के लड़के ने 85 लाख रुपये के गहने दुकानदारों को दे दिए। लड़के की कमजोरी का फायदा उठाकर तीन लोगों ने ये काम किया, जिनकी पुलिस जांच कर रही है।