शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Uttar Pradesh Crime: मुलीला गाडलं तर मुलाला शेतात फेकून दिलं; ऑनर किलिंगच्या घटनेनं युपीत खळबळ...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2022 20:50 IST

Uttar Pradesh Crime: प्रेमी युगुल आक्षेपार्ह स्थितीत आढळल्यानंतर मुलीच्या कुटुंबीयांना दोघांची निर्घृण हत्या केली.

Uttar Pradesh Crime: उत्तर प्रदेशातील बस्ती जिल्ह्यातून ऑनर किलिंगचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. आक्षेपार्ह स्थितीत आढळल्याने कुटुंबीयांनी प्रेमी युगुलाची निर्घृण हत्या केली. हत्येनंतर मुलीचा मृतदेह घराजवळ जमिनीत गाडला, तर मुलाचा मृतदेह उसाच्या शेतात फेकून दिला. 

मिळालेल्या माहितीनुसार, प्रेमी युगुलाला आक्षेपार्ह स्थितीत पाहून मुलीच्या कुटुंबीयांनी दोघांची हत्या केली. हत्येनंतर मुलीचा मृतदेह घराजवळील जमिनीत गाडला आणि मुलाचा मृतदेह गावाबाहेरील उसाच्या शेतात फेकून दिला. शेतमालकाने मुलाचा मृतदेह पाहिल्यानंतर ही बाब उघडकीस आली. मृतदेहाची माहिती मिळताच पोलीसा घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांना तरुणाच्या शरीरावर ओरखडे व जखमांच्या गंभीर खुणा दिसल्या. मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला असता, मृत व्यक्ती त्याच गावातील रहिवासी असल्याचे समोर आले.

असा झाला खुलासापोलिसांच्या चौकशीत मृताच्या वडिलांनी सांगितले की, त्यांचा मुलगा रात्रभर बेपत्ता होता आणि त्याचा मोबाईलही बंद होता. रात्री कुटुंबीयांनी त्याचा खूप शोध घेतला, पण तो काही सापडला नाही. मृत मुलगा गावातील एका व्यक्तीच्या ट्रॅक्टरवर चालक होता आणि त्याच्या घरी येणे-जाणे असायचे. यानंतर पोलिसांनी ट्रॅक्टर मालकाच्या घरी जाऊन पाहिले असता त्याच्या मुलीचाही मृत्यू झाल्याचे समजले.

मुलीचा मृतदेह काढलामृत मुलीला घराजवळ पुरण्यात आले होते. तेव्हापासून मुलीचे संपूर्ण कुटुंब फरार आहे. तपासादरम्यान मयत मुलगा आणि मुलगी यांच्यात प्रेमसंबंध सुरू असल्याचे समोर आले. मुलीच्या कुटुंबीयांनी दोघांनाही आक्षेपार्ह अवस्थेत पाहिल्यानंतर दोघांची हत्या करून ते पळून गेल्याचे पोलिसांनी सांगितले. मुलीचा पुरलेला मृतदेह पोलिसांनी जमिनीतून बाहेर काढला, तिच्याही अंगावर जखमेच्या खुणा आढळून आल्या. पोलिसांनी दोन्ही मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवले असून, गावातील तणावाची परिस्थिती पाहता अतिरिक्त फौजफाटाही तैनात करण्यात आला आहे. मृत मुलीच्या कुटुंबीयांविरुद्ध कलम 302, 201, 34 आयपीसी आणि एसी-एसटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असून फरार आरोपींना पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारीDeathमृत्यू