शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

संतापजनक! भर बाजारात युवतीचा लिलाव, 80 हजारांपर्यंत लागली बोली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2020 16:53 IST

लिलावात पीडित युवतीवर 50 हजार रुपयांपासून बोली सुरू होऊन ही बोली 80 हजारांपर्यंत पोहोचली.

बुलंदशहर  (उत्तर प्रदेश) - 16 वर्षांच्या युवतीचा भर बाजारामध्ये  लिलाव करण्याचा संतापजनक प्रकार घडल्याची घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशमधील बुलंदशहर जिल्ह्यातील अहमदगड पोलीस ठाण्याच्या क्षेत्रात हा प्रकार घडला असून,  या लिलावात सहभागी होण्यासाठी 20 वर्षाच्या तरुणांपासून 80 वर्षांच्या वृद्धांपर्यंतची मंडळी घटनास्थळावर उपस्थित होती. लिलावात पीडित युवतीवर 50 हजार रुपयांपासून बोली सुरू झाली. तसेच ही बोली 80 हजारांपर्यंत पोहोचली. त्याचवेळी पोलिसांनी घटनास्थळावर येत पीडितेची सुटका केली आणि तिच्या लिलावाचा डाव उधळून लावला. याबाबत सविस्तर माहिती अशी, झारखंडमधील रांची येथील रहिवासी असलेल्या या 16 वर्षीय मुलीच्या आईचा वर्षभरापूर्वी मृत्यू झाला होता. त्यानंतर तिच्या सावत्र आईने या मुलीला रांचीजवळील पिसका नगरी गावातील कलावती या महिलेला 50 हजार पुयांना विकले. त्यानंतर या कलावती नामक महिलेने या मुलीला बुलंदशहरमधील गावात विक्रीसाठी आणले. त्यानंतर संपूर्ण गावात ही खबर पसरली. बघता बघता गर्दी गोळा झाली. निरागस युवतीवर बोली लागण्यास सुरुवात झाली. बोली लावणाऱ्यांमध्ये तरुणांपासून वुद्धही आघाडीवर होते. बघता बघता बोलीचा आकडा 80 हजारांपर्यंत पोहोचला. सुरुवातीला काय चालले आहे हे पीडितेला समजलेच नाही. मात्र बोली लावणाऱ्या लोकांनी तिच्याशी लगट करण्यास सुरुवात केली तेव्हा ती युवती घाबरून रडू लागली. तेवढ्यात पोलीस घटनास्थळी दाखल झाले त्यानंतर पोलिसांनी पीडितेची सुटका करत  2 महिलांसह 7 जणांना अटक केली. अटक करण्यात आलेल्यांमध्ये पीडितेला विकण्याचा प्रयत्न करणाऱ्या कलावतीचाही समावेश आहे. सध्या पीडित युवती महिला सेलच्या ताब्यात असून, ती आपल्या कुटुंबीयांची वाट पाहत आहे.  

दरम्यान, अटक करण्यात आलेली कलावती या महिलेने यापूर्वीही अनेक तरुणींची विक्री केल्याची माहिती समोर आली आहे. ही महिला झारखंडमधील विविध भागातून 30 ते 50 हजार रुपयांना खरेदी करते नंतर या मुलींची एक लाख रुपयांपर्यंतच्या किमतीस विक्री करते.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेश