शहरं
Join us  
Trending Stories
1
Jharkhand: झारखंडमध्ये भीषण अपघात, कावडियांची बस ट्रकवर आदळली; १९ जणांचा मृत्यू
2
Nimisha Priya : केरळमधील नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा रद्द; भारताच्या मुत्सद्देगिरीला अखेर यश
3
खेकड्यांनी धरण पोखरल्यानंतर आता नवा शोध! मंत्री म्हणतात, ४००० टन कोळसा पावसात वाहून गेला...
4
राज्यात नव्या राजकीय समीकरणाची नांदी; शेकापच्या कार्यकर्त्यांना राज ठाकरे करणार मार्गदर्शन
5
घोटाळ्यात उपघोटाळा; ९ हजारांवर सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी घेतला ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ
6
आजचे राशीभविष्य २९ जुलै २०२५ : आर्थिक लाभाचे योग, नोकरीत वरिष्ठ देखील खुश होतील
7
समाज माध्यमांत राज्य सरकारवर टीका केल्यास कर्मचाऱ्यांवर ‘शिस्तभंग’; परिपत्रक जारी
8
पहलगाम मास्टरमाइंडसह तिघांचा खात्मा; ‘ऑपरेशन महादेव’ने दहशतवाद्यांची कोंडी, ‘असा’ लागला छडा
9
...तर सत्ताकांक्षी भाजपा भविष्यहीन पक्ष बनेल; आता योद्धे हवेत, भाड्याचे तट्टू कामाचे नाहीत!
10
दहशतवाद संपवण्यास कोणत्याही थराला जाऊ शकतो ‘नवा भारत’; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा इशारा
11
“केंद्र सरकार कोणापुढे झुकले हे स्पष्ट झाले पाहिजे, पीओके परत कधी घेणार?”: गौरव गोगोई
12
नागपूरची १९ वर्षीय दिव्या देशमुख दिग्गज कोनेरू हम्पीला पराभूत करत झाली विश्वविजेती
13
दिल्लीत सांस्कृतिक भवन होणार; आराखडा सादर, डॉ. विजय दर्डा यांच्या प्रयत्नांना मोठे यश
14
निशिकांत दुबेंना जाब विचारणाऱ्यांचे राज ठाकरेंनी मानले आभार; काँग्रेस खासदारांचे केले कौतुक
15
५ वर्षांत २,०९४ विमाने बिघाडली, प्रवाशांना टेन्शन; १८३ तांत्रिक बिघाड, सरकार काय करतेय?
16
नाव ‘डॉग बाबू’, वडिलांचे नाव ‘कुत्ता बाबू’, आईचे नाव ‘कुतिया देवी’; बिहार प्रशासनाचे देशभर वाभाडे
17
संजय राऊत मानहानी प्रकरण: नितेश राणेंविरोधातील अजामीनपात्र वॉरंट रद्द; कोर्टासमोर हजर होणार
18
नालेसफाईतील घोटाळेबाजांना १५ कोटींचा दंड; ‘लोकमत’च्या स्टिंग ऑपरेशननंतर कारवाईला आणखी वेग
19
काय गडबड आहे? विद्यार्थी जीवन का संपवत आहेत? न्यायालयाकडून प्रश्न; म्हटले, वेगाने तपास करा
20
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!

बदायूंमध्ये 2 चिमुकल्यांची निर्दयी हत्या, आरोपी साजिद रक्तही प्यायला! थरकाप उडवणारी घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2024 13:30 IST

अशी घडली संपूर्ण घटना, हत्‍येनंतर जावेद तेथेच उभा होता...!

बदायूं - उत्तर प्रदेशातील बदायूं येथून दुहेरी हत्याकांडाची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हत्याकांडानंतर संपूर्ण परिसरात तणावाचे वातावरण आहे. घटनास्थळीही मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. दोन मुलांची हत्या करणाऱ्या आरोपी साजिदला पोलिसांनी एन्काउंटरमध्ये ठार केले आहे. यानंतर, पोलिसांनी लवकरात लवकर दुसरा आरोपी असलेल्य जावेदचेही  एन्काउंटर करावे, तेव्हाच मला न्याय मिळेल, असे आपल्या काळजाचे तुकडे गमावलेल्या आईने म्हटले आहे.

साजिदने 11 आणि 9 वर्षांच्या चिमुकल्यांची निर्दयी हत्या केल्यानंतर परिसरात सन्नाटा पसरला आहे. काही माध्यमांतील वृत्तांनुसार, पीडित कुटुंबाने या संपूर्ण घटनाक्रमाला जादू-टोण्याशी जोडले आहे. एवढेच नाही, तर साजिदने हत्‍या करून मुलांचे रक्तही प्यायले. त्याच्या तोंडाला मांसाचे तुकडे लागलेले होते, असा आरोपही त्यांनी केला आहे. पोलीस या आरोपांचा तपास करत आहे. घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त आहे.

जन्माला येताच मरण पावली होती साजिदची 5 मुलं -या दुहेरी हत्याकांडामागे काही जादू-टोण्याचा प्रकार असू शकतो, अशी चर्चा परिसरात आहे. आरोपी साजिदने एकदा, आपली पाच मुले जन्माला येताच मरण पावली, एकही बचावले नाही, असे संगीताला सांगितले होते. आता पुन्हा जिल्हा महिला रुग्णालयात पत्नीची प्रसूती आहे. यासाठी त्याने संगीताकडून पाच हजार रुपयेही उसने घेतले होते. त्याने छतावर जाऊन मुलांची हत्या केली. महत्वाचे म्हणजे, या घटनेमागे जुने वैमनस्यही असू शकते, असे काही लोक म्हणत आहेत. मात्र या दुहेरी हत्येचे नेमके कारण काय? हे अद्याप पोलिसांना समजू शकलेले नाही.

अशी घडली संपूर्ण घटना, हत्‍येनंतर जावेद तेथेच उभा होता -यासंदर्भात स्थानिकांनी केलेल्या दाव्यानुसार, दोन्ही मुलांच्या हत्येनंतर आरोपी जावेद तेथेच उभा होता. एका प्रत्यक्षदर्शीने म्हटले आहे की, मंडी समिती चौकीजवळ नवीन बाबा कॉलनी विकसित झाली आहे. या वसाहतीत पाण्याच्या टाक्या बांधणारे कंत्राटदार विनोद कुमार हे कुटुंबासह राहतात. त्यांना तीन मुले आहेत. त्याची पत्नी ब्युटी पार्लरचे काम करते. पत्नी संगीताने दिलेल्या माहितीनुसार, शेजारीच सलून चालवणारे आरोपी साजिद आणि जावेद त्यांच्या घरी आले. आरोपीने सर्वप्रथम संगीताकडून 45 रुपयांचे सामान खरेदी केले. यानंतर पत्नीच्या उपचारासाठी 5 हजार रुपये घेतले. यावेळी संगीताने आरोपी साजिदला चहा दिला, आरोपीने चहा घेण्यास सुरुवात केली. यावेळी दुसरा आरोपी जावेद बाहेर बसला होता. चहा घेत आरोपी साजिद घराच्या तिसऱ्या मजल्यावर पोहोचला आणि तिथेच त्याने विनोदच्या दोन्ही मुलांवर चाकू आणि वस्तऱ्याने हल्ला केला.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशPoliceपोलिसDeathमृत्यू