अतरंगी पोशाख घालणाऱ्या उर्फी जावेदला बलात्काराची धमकी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2022 07:05 AM2022-08-18T07:05:06+5:302022-08-18T07:06:04+5:30

उर्फीकडे शरीरसुखाची मागणी करत तिला जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचा आरोप या व्यक्तीवर आहे.

Urfi Javed, who wears colorful clothes, is threatened with rape | अतरंगी पोशाख घालणाऱ्या उर्फी जावेदला बलात्काराची धमकी

अतरंगी पोशाख घालणाऱ्या उर्फी जावेदला बलात्काराची धमकी

googlenewsNext

मुंबई : अतरंगी पोशाख करत त्याच्या पोस्ट सोशल मीडियावर टाकणारी उर्फी जावेद हिला धमकावणाऱ्या पंजाबच्या रहिवाशाला गोरेगाव पोलिसांनी अटक केली. उर्फीकडे शरीरसुखाची मागणी करत तिला जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचा आरोप या व्यक्तीवर आहे.

उर्फीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये तिने सांगितले की, पंजाबी सिनेक्षेत्रातील एक व्यक्ती तिचा विनयभंग करून त्रास देत आहे. या प्रकरणी संबंधितावर गुन्हा दाखल करून त्याला अटक झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. उर्फीचा विनयभंग करणाऱ्या या व्यक्तीचे नाव ओबेद आफ्रिदी आहे. तो पंजाबी सिने इंडस्ट्रीमध्ये कास्टिंग डायरेक्टर म्हणून काम करत होता. उर्फीच्या आरोपांनंतर एका मुलाखतीत ओबेदने अभिनेत्रीचे सर्व आरोप फेटाळले होते. 

Web Title: Urfi Javed, who wears colorful clothes, is threatened with rape

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.