शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

'पोलिसांनी रात्री घरात घुसून मारहाण केली'; UPSC ची तयारी करणाऱ्या तरुणीचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2021 15:04 IST

तरुणीच्या भावाचे गावातील एका तरुणासोबत भांडण झाले होते, त्याचा तपास करण्यासाठी पोलिस आले होते.

लखीमपूर खेरी:उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथील एका UPSC ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यीनीने पोलिसांवर मारहाणीसह घरातील पुस्तके फाडल्याचा आरोप केला आहे. या आरोपानंतर पोलीस प्रशासनात खळबळ उडाली आहे. हे प्रकरण लखीमपूर खेरीच्या सदर कोतवाली भागातील अगोश पुरवा गावाचे आहे. गावातील यूपीएससीची तयारी करणाऱ्या प्रांशु शुक्ला या विद्यार्थ्यीने सदर कोतवाली परिसरातील नाकाहा चौकीचे प्रभारी नरेंद्र प्रताप सिंह आणि त्यांच्या तीन कॉन्स्टेबलवर रात्री 9 वाजता घरात घुसून प्राणघातक हल्ला करत पुस्तके फाडल्याचा आरोप केला आहे. याबाबत विद्यार्थ्यीने पोलीस ठाण्यात लेखी तक्रारदेखील दाखल केली आहे.

प्रांशु शुक्ला यांचे म्हणणे आहे की, तिचा मोठा भाऊ कल्लनचे एका तरुणासोबत भांडण झाले होते. या प्रकरणाबाबत नरेंद्र प्रताप सिंह तीन कॉन्स्टेबलसह त्यांच्या घरी रात्री 8 वाजता चौकशी करण्यासाठी आले. चौकशी केल्यानंतर ते परत गेले. त्यानंतर रात्री 9:00 वाजता पुन्हा नरेंद्र प्रताप सिंह त्याच तीन कॉन्स्टेबलसह परत आले. 

यावेळी प्रांशुची आई आणि वहिनीदेखील घरात उपस्थित होत्या. पोलिसांनी महिला कॉन्स्टेबलला सोबत आणले नव्हते आणि रात्री घरात घुसून पुन्हा चौकशी सुरू केली. चौकशीदरम्यान पोलिसांनी प्रांशु यांच्या कानशिलात लगाबली. यात तिचे डोके भिंतीवर आदळल्याने ती जखमी झाली. याबाबत आता प्रांशुने सदर पोलिस स्टेशनमध्ये लेखी तक्रार दाखल केली आहे. तसेच, 26 सप्टेंबरच्या रात्री घडलेल्या घटनेबाबात अद्याप पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नसल्याचा आरोपही केला आहे.     

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारीupscकेंद्रीय लोकसेवा आयोग