शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

युपीचा मुन्नाभाई MBBS... हजारो शस्त्रक्रिया करणाऱ्या बोगस डॉक्टरला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2019 17:54 IST

उत्तर प्रदेशातीस सहारनपूर येथे हा प्रकार घडला

ठळक मुद्दे पोलिसांनी या बोगस डॉक्टरला म्हैसूर येथून अटक केली आहे. आरोपीने आतापर्यंत हजारो शस्त्रक्रिया केल्या आहेत अशी माहिती दिली.आरोपी आधी मंगळुरु हवाई दलाच्या रुग्णालयात पॅरामेडिक म्हणून काम करत होता.

मेरठ - बॉलिवूड अभिनेता संजय दत्तच्या मुन्नाभाई एमबीबीएस या हिंदी सिनेमाप्रमाणे एक धक्कादायक घटना उत्तर प्रदेशात घडली आहे. मात्र, या मुन्नाभाईने फक्त आपण डॉक्टर असल्याचं भासवलं नाही तर गेल्या १० वर्षात हजारांहून जास्त शस्त्रक्रिया केल्या आहेत. उत्तर प्रदेशातीस सहारनपूर येथे हा प्रकार घडला असून पोलिसांनी या बोगस डॉक्टरला म्हैसूर येथून अटक केली आहे. या बोगस डॉक्टराचं नाव ओम पाल (५०) उर्फ राजेश शर्मा असं आहे. सहारनपूरचे एसपी विद्यासागर मिश्रा यांनी देवबंद येथील ओम पाल (५०) उर्फ राजेश शर्मा या व्यक्ती येथील स्थानिक आरोग्य केंद्रात बनावट पदवी आणि बनावट नोंदणीच्या आधारे स्वत: डॉक्टर असल्याचं सांगत गेल्या १० वर्षांपासून प्रॅक्टिस करत होता. तो एक नर्सिंग होमही चालवत होता. आरोपीने आतापर्यंत हजारो शस्त्रक्रिया केल्या आहेत अशी माहिती दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने म्हैसूर विद्यापीठात एमबीबीएसचं शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थ्याच्या नावे बनावट पदवी तयार करुन घेतली होती. खंडणीशी संबंधित एका फोन कॉलची तक्रार करण्यासाठी पोलीस ठाण्यात गेला असता बोगस डॉक्टरचा भांडाफोड झाला.कोणालाही आपली संशय येऊ नये यासाठी त्याने होर्डिंगपासून ते प्रत्येक ठिकाणी डॉक्टर राजेश शर्मा या नावाचा उल्लेख केला. एका अज्ञात व्यक्तीने फोन करुन ४० लाखांची खंडणी मागत खरी माहिती उघड करण्याची धमकी दिली असता आरोपी तक्रार करण्यासाठी पोलीस ठाण्यात गेला आणि तिथेच त्याच्या गैरप्रकाराचं पितळ उघड झालं. आरोपी आधी मंगळुरु हवाई दलाच्या रुग्णालयात पॅरामेडिक म्हणून काम करत होता. ज्याची पेन्शन अद्यापही त्याला मिळत आहे. त्यावेळी त्याच्यासोबत राजेश नावाचे एक डॉक्टरही काम करत होते. नंतर ते परदेशात निघून गेले. राजेश परदेशात निघून गेल्यानंतर ओम पाल याने राजेश यांच्या एमबीबीएस पदवीवर आपला फोटो लावला आणि फसवणूक करण्यास सुरुवात केली. पदवीच्या आधारेच त्याला आरोग्य केंद्रात सर्जनची नोकरी मिळाली अशी पुढे अधिक माहिती पोलिसांनी दिली आहे.

टॅग्स :Arrestअटकdoctorडॉक्टरPoliceपोलिसUttar Pradeshउत्तर प्रदेश