शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

माजी आमदाराने केली फसवणूक; व्यावसायिकाला ४५ लाखांना गंडवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2023 11:52 IST

तक्रारदार शशिकांत मिश्रा (४२) यांचा ट्रेडिंगचा व्यवसाय असून, त्यांची गेल्या वर्षी पासी यांच्याशी ओळख झाली होती

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : घराची खोटी कागदपत्रे बनवत त्याठिकाणी नावाने रेस्टॉरंट सुरू करून देतो आणि व्यवसायात ५० टक्के भागीदारी देतो, असे सांगत व्यावसायिकाला ४५ लाखांचा गंडविण्यात आले. याप्रकरणी वर्सोवा पोलिसात तक्रार दिल्यावर उत्तर प्रदेशचे सपाचे माजी आमदार सुभाष पासी आणि त्यांच्या दोन मुलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदार शशिकांत मिश्रा (४२) यांचा ट्रेडिंगचा व्यवसाय असून, त्यांची गेल्या वर्षी पासी यांच्याशी ओळख झाली होती. उत्तर प्रदेशातील सपाचे आमदार असल्याचे त्यांनी मिश्रा यांना सांगितले. वर्सोव्याच्या आरामनगर येथील प्रॉपर्टी भानुदास चव्हाण व शीतल चव्हाण यांच्याकडून २८ जून, २०२१ रोजी पाच वर्षांसाठी भाडेतत्त्वावर घेतली असल्याचे सांगितले. ज्याचा ताबा आता त्यांची मुले निखिल आणि राहुल यांच्याकडे असल्याचेही सांगत त्यांना खोटे कागदपत्र दाखवून त्या ठिकाणी रेस्टॉरंट उघडण्याचे म्हटले. याबाबत मिश्रा यांनी त्यांचा मित्र अरविंद सिंग याला माहिती दिली आणि त्यांनीही त्या ठिकाणी भागीदार बनण्याची तयारी दाखवली. सिंग आणि मिश्राने मिळून वेळोवेळी पासी आणि त्यांच्या मुलांना जवळपास ४५ लाख रुपये पाठवले. वर्ष झाले, तरी रेस्टॉरंट आणि बारबाबतच्या एनओसी न मिळाल्याने   मिश्रा यांनी पासीकडे पैसे परत मागितले. त्यांना जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या गेल्या. याप्रकरणी वर्सोवा पोलिसांनी भारतीय दंड संहिता कलम ३४ आणि ४२० अंतर्गत गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास सुरू आहे.

 

टॅग्स :MLAआमदारCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस