शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

IAS पती विरोधात पोलिसांकडे गेली महिला IAS, म्हणाली - हनीमूनला समजलं तो....

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2022 14:48 IST

Uttar Pradesh : महिला आयएएसने आपल्या आयएएस पती विरोधात पोलिसात दाखल केलेल्या तक्रारीनुसार, त्या दोघांचं ५ मे १९९० रोज लग्न झालं होतं.

एका आयएएस दाम्पत्याचा (IAS Couple) खाजगी वाद आता उत्तर प्रदेशमधील (Uttar Pradesh) लखनौच्या पोलीस स्टेशनपर्यंत पोहोचला. एक महिला आयएएसने आपल्या आयएएस पतीवर शारीरिक अक्षमता, मारहाण आणि लाखो रूपये हडपल्याचा आरोप करत त्याच्यावर केस दाखल केली आहे. तेच यासंबंधी पोलिसांनी सांगितलं की, ते महिला आयएएसकडून पतीवर लावण्यात आलेल्या आरोपांची चौकशी करत आहेत.

महिला आयएएसने आपल्या आयएएस पती विरोधात पोलिसात दाखल केलेल्या तक्रारीनुसार, त्या दोघांचं ५ मे १९९० रोज लग्न झालं होतं. ज्यानंतर हनीमून दरम्यान तिला समजलं की, तिचा पती शारीरिक रूपाने सक्षम नाही. पण उलट तोच तिच्यावर शारीरिक अक्षमतेचा आरोप लावत तिला मारहाण करू लागला होता. महिला आयएएसने आरोप लावला की, पतीच्या शारीरिक कमजोरीमुळे कधी तिचा परिवार पूर्ण होऊ शकला नाही. ती म्हणाली की, 'तिचा पती नेहमीच तिला एखाद्या दुसऱ्या महिलेकडे जाण्याचा धमकी देत होता आणि विरोध केल्यावर मारहाण करत होता'.

महिला आयएएसचा आरोप आहे की, काही महिन्यांनापूर्वी ती आणि तिची आई कोरोनाने संक्रमित झाली होती. ज्यानंतर स्थिती गंभीर झाल्याने त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल व्हावं लागलं. यादरम्यान तिच्या पतीने तिच्या बॅंक खात्यातून १९.५० लाख रूपये गायब केले. त्यासोबतच  पतीने डॉक्टरला न दाखवता त्यांना चुकीची औषधं देण्याचा प्रयत्न केला.

महिलेने सांगितलं की,  कोविड दरम्यान तिला ब्लॅक फंगससाऱखा गंभीर आजारही झाला होता. पण पतीने तिला याची माहिती दिली नाही. जेणेकरून वेळेवर माझ्यावर योग्य उपचार करता येऊ नये आणि समस्या अधिक गंभीर व्हावी. तेच लग्नाच्या इतक्या वर्षानंतर अशाप्रकारचे आरोप लावण्यावरून तिला प्रश्न विचारला तर तिने सांगितलं की, परिवार तुटण्यापासून वाचवण्यासाठी ती इतक्या वर्षांपासून त्रास सहन करत राहिली. पण आता प्रकरण हाताबाहेर गेलं आहे. 

हे पण वाचा :

LOC, LAC आणि International Border मध्ये नेमका फरक तरी काय आहे? 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारी