शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

युपीत तरुणीला नग्न करुन मारहाण; 7 आरोपींच्या घरावर चालला 'बाबा का बुलडोजर'

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2022 14:49 IST

UP Crime News: पार्कमध्ये फिरायला आलेल्या तरुणीचा नग्न व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या आरोपींवर कारवाई झाली आहे.

UP Crime News:उत्तर प्रदेशात योगी सरकारच्या काळात गंभीर गुन्हेगारांच्या घराबर बुलडोझर कारवाई करण्यात येते. आता परत एकदा अशाच प्रकारची घटना घडली आहे. तरुणीला नग्न करुन मारहाण करणाऱ्या आरोपींच्या घरांवर बुलडोझर चालवण्यात आला. हमीरपूर जिल्ह्यात सिटी फॉरेस्ट पार्कमध्ये तरुणीचा नग्न व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या या सात आरोपींवर कारवाई करण्यात आली आहे.

प्रशासनाला सात आरोपींचे अवैध अतिक्रमण आढळून आले, यानंतर हे अवैध अतिक्रमण पाडले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कारागृहात पाठवण्यात आलेल्या सात आरोपींनी अवैध अतिक्रमण केले होते. या सात आरोपींनी सिटी फॉरेस्ट पार्कमध्ये मैत्रिणीसोबत फिरायला गेलेल्या तरुणीला नग्न करून मारहाण केल्याचा व्हिडीओ बनवला होता. हे सातही गुन्हेगार तुरुंगात असून त्यांच्या घरांच्या बेकायदा बांधकामांवर पालिका आणि पोलिसांच्या पथकाने बुलडोझर फिरवला आहे.

पोलिसांनी सांगितले की, 16 ऑगस्ट रोजी हमीरपूरमध्ये ही क्रूर घटना घडली होती, ज्यामध्ये सिटी फॉरेस्ट परिसरातील आरोपींनी तरुणीला नग्न करुन मारहाण केली होती. तसेच, या घटनेचा व्हिडिओही व्हायरल केला होता. यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपींना अटक केले. घटनेतील काहीजण अद्याप फरार आहेत, त्यांचा शोध सुरू आहे.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस