शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

UP Crime News: लिफ्ट, बलात्काराचा प्रयत्न, हत्या आणि एन्काउंटर; वाचा उत्तर प्रदेशातील धक्कादायक घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2022 12:55 IST

UP Crime News: उत्तर प्रदेशात एन्काउंटरच्या घटना सातत्याने घडत आहेत. आता कौशांबी जिल्हा पोलिसांनी बलात्काराचा प्रयत्न आणि हत्या करणाऱ्या आरोपीला गोळ्या घातल्याची घटना घडली आहे.

कौशांबी: उत्तर प्रदेशातील कौशांबी जिल्ह्यातून चकमकीची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यूपी पोलिसांनी तरुणीवर बलात्काराचा प्रयत्न आणि हत्या करणाऱ्या आरोपीला गोळ्या घातल्या आहेत. आरोपीच्या दोन्ही पायांना गोळ्या घातल्या असून, तो सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. 

काय आहे संपूर्ण प्रकरण?करारी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आधार गावातील एक तरुणीचे घरात भांडण झाल्यानंतर, ती पायी चालत आपल्या बहिणीच्या घराकडे निघाली. 16 एप्रिल रोजी ती घरातून निघाली, पण बहिणीच्या घरी पोहोचली नाही. यानंतर कुटुंबीयांनी तिचा शोध सुरू केला, मात्र ती कुठेच न सापडल्याने त्यांनी करारी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. 

आरीपीने दिली लिफ्ट...पोलिसांच्या तपासात समोर आले की, आरोपी राजेंद्रने मुलीला आपल्या गाडीवरुन लिफ्ट दिली होती. मुलगी त्याच्यासोबत दुचाकीवर बसली. अंधाराचा फायदा घेत राजेंद्रने तिला चिल्ला शाहबाजी गावाजवळील बागेत नेऊन तिच्यावर जबरदस्तीने बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. यावर तरुणीने आक्षेप घेतल्यानंतर आरोपीने तिचे तोंड दाबून खून केला आणि मृतदेह तिथेच टाकून पळ काढला.

चकमकीत दोन्ही पायांना लागल्या गोळ्यादुसऱ्या दिवशी म्हणजेच 17 एप्रिलला मुलीचा मृतदेह सापडल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. तपासादरम्यान ती राजेंद्र नावाच्या तरुणासोबत दुचाकीवरून गेल्याची माहिती मिळाली. पोलीस आरोपीला अटक करण्यासाठी जात होते, पण आरोपीने पहाटे 4 ते 5 वाजेच्या सुमारास दुचाकीवरुन प्रयागराजला पळून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी तरुणाने त्याच्याकडील पिस्तुलाने पोलिसांवर गोळीबार केला. प्रत्युत्तरादाखल पोलिसांनीही गोळीबार केला, यात त्याच्या दोन्ही पायांना गोळ्या लागल्या.

 

 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस