तरुणाला जेवणातून नशा देऊन अनैसर्गिक अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2022 10:05 IST2022-10-10T10:05:28+5:302022-10-10T10:05:38+5:30

मारहाण करून दिले सिगारेटचे चटके

Unnatural abuse of youth by giving them food | तरुणाला जेवणातून नशा देऊन अनैसर्गिक अत्याचार

तरुणाला जेवणातून नशा देऊन अनैसर्गिक अत्याचार

लोकमत न्यूज नेटवर्क 
नालासोपारा : मीरा रोड येथे राहणाऱ्या ३२ वर्षीय पीडित तरुणाला जेवणातून नशेचा पदार्थ देऊन मारहाण करत अनैसर्गिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना नालासोपारा येथे घडली आहे. आरोपीने पीडित तरुणाला चक्क पायावर सिगारेटचे चटके दिले आहेत. पीडित तरुणाने शनिवारी नालासोपारा पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यावर पोलिसांनी पाच आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ही घटना उघड झाल्याने नालासोपारा शहरात खळबळ माजली आहे. 

३२ वर्षीय पीडित तरुण हा मैत्रिणीसह तिच्या दोन मित्रांच्या नालासोपाऱ्याच्या घरी १२ सप्टेंबरला आला होता. मैत्रिणींसह दोन्ही आरोपींनी संगनमत करून १२ सप्टेंबरच्या रात्री साडेअकराच्या सुमारास अर्नाळा बीचवर फिरायला जायचे आहे, असे सांगून पीडित तरुणाला अर्नाळा येथील एका हॉटेलमध्ये घेऊन गेले. पीडित तरुण बियर प्यायल्याचा गैरफायदा घेऊन त्याच्या जेवणात नशेचा पदार्थ टाकून फार्म हाऊसच्या मालकाने ठोशाबुक्यांनी मारहाण केली. मैत्रिणीच्या मित्राने १३ सप्टेंबरला सकाळी त्याच्या घरी आणून लाकडी दांडक्यांनी पाठीवर मारहाण केली. आरोपीने त्याच्यासोबत अश्लील चाळे करून दुसऱ्या आरोपीने पायावर सिगारेटचे चटके दिले. पीडित तरुणाचे यावेळी २५ हजार ५०० रुपये आणि घड्याळ हरवले असल्याचे शनिवारी नालासोपारा पोलिसांना सांगून घडलेली हकीकत सांगितली. पोलिसांनी पीडित तरुणाच्या तक्रारीवरून त्याची मैत्रिण, तिचे दोन मित्र, हॉटेल व फार्म हाऊसचे मालक अशा पाच आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Unnatural abuse of youth by giving them food