शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
5
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
6
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
7
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
8
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
9
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
10
आयोग नव्हे, मतदारच राजा !
11
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
12
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
13
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
14
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
15
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
16
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
17
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
18
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
19
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
20
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज

प्रेमासाठी काय पण! बॉयफ्रेंडसोबत लग्न करण्यासाठी गर्लफ्रेंडने स्वत:वरच केला अ‍ॅसिड अटॅक अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2021 15:33 IST

Crime News : बॉयफ्रेंडसोबत लग्न करण्यासाठी गर्लफ्रेंडने स्वत:वरच अ‍ॅसिड अटॅक केला आहे.

नवी दिल्ली - प्रेमासाठी काही जण वाटेल ते करतात. अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कुटुंबीयांनी लग्नाला परवानगी द्यावी म्हणून एका कपलने भयंकर पाऊल उचललं आहे. बॉयफ्रेंडसोबत लग्न करण्यासाठी गर्लफ्रेंडने स्वत:वरच अ‍ॅसिड अटॅक केला आहे. ज्यानंतर घरच्यांनी तिचं बॉयफ्रेंडसोबत लग्न लावून दिलं. बिहारच्या नालंदा जिल्ह्यात ही धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी याप्रकरणी तरुणीसह पाच आरोपींनी अटक केली आहे. 48 तासांच्या आतमध्ये त्यांनी या प्रकरणाची पोलखोल केली.

डीएसपी शिब्ली नोमानी यांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणीचं साजन कुमार नावाच्या तरुणासोबत गेल्या सात वर्षांपासून प्रेमप्रकरण होतं. मात्र तरुणीच्या घरच्यांनी या लग्नाला विरोध केला होता. त्यामुळे या दोघांनी मिळून हा मोठा निर्णय घेतला. तसेच अ‍ॅसिड अटॅक करून शरीराच्या काही भागाला इजा पोहचवण्याचं ठरवलं. असं केल्यानंतर तरुणीच्या घरचे लग्नाला तयार होतील असं त्यांना वाटलं. म्हणूनच 18 ऑगस्टला साजनने आपल्या तीन भावांसह हे कृत्य केलं. ज्या दिवशी घटना घडली तेव्हा साजन आणि तरुणी एकत्रच फिरत होते. 

तरुणीवर दोन तरुणांनी अ‍ॅसिड फेकल्याची घटना रस्त्यावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. पोलिसांनी याप्रकरणाचा अधिक तपास केला असता ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. पत्नीच्या प्रियकराला मारण्यासाठी तांत्रिकाकडे गेलेल्या पतीचीच हत्या झाली आहे. एका पतीला आपल्या पत्नीचे दुसऱ्या व्यक्तीसोबत असल्याचा संशय होता. यामुळे त्याने तांत्रिकांची मदत घेतली. जेणेकरून पत्नीच्या प्रियकराला आपला रस्त्यातून बाजूला करता येईल. मात्र, तांत्रिकाच्या नादात पतीचीच हत्या झाली. 

भयंकर! पत्नीच्या प्रियकराला मारण्यासाठी तांत्रिकाकडे गेलेल्या पतीचीच झाली हत्या; असा झाला उलगडा

मिळालेल्या माहितीनुसार, तांत्रिकाकडे येत असतानाच याच काळात नीरज दीक्षित याची भेट शैलेंद्र नावाच्या एका व्यक्तीसोबत झाली. शैलेंद्र आपल्या भावासाठी तांत्रिकाकडे येत असे. काहीच दिवसांत शैलेंद्र आणि नीरज यांची मैत्री झाली. यादरम्यान शैलेंद्रने नीरजकडून 75 हजार रुपये घेतले आणि तांत्रिक पूजा करून त्याच्या पत्नीच्या प्रियकराची हत्या करेल असं म्हटलं. मात्र, काही दिवसांनी नीरजने शैलेंद्रला म्हटलं की अजूनही काहीच झालेलं नाही आणि दोघांमध्ये भांडण सुरू झालं. यानंतर शैलेंद्रने नीरजला म्हटलं, की तुला हमीपुरच्या मोठ्या तांत्रिकाला भेटवतो. नीरजही तयार झाला आणि त्याच्यासोबत गेला. मात्र, यादरम्यान शैलेंद्रनं आपले मित्र धर्मेंद्र आणि शामू यांच्या मदतीनं नीरजची हत्या केली. 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसIndiaभारत