केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या भावाला अटक; फसवणुकीच्या एका प्रकरणात कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2024 05:53 IST2024-10-20T05:52:56+5:302024-10-20T05:53:35+5:30

अटक झालेल्या भावाशी तीन दशकांपेक्षा जास्त काळापूर्वीच संबंध ताेडल्याची प्रल्हाद जाेशी यांची माहिती

Union Minister Prahlad Joshi brother arrested; Proceedings in a case of fraud | केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या भावाला अटक; फसवणुकीच्या एका प्रकरणात कारवाई

केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या भावाला अटक; फसवणुकीच्या एका प्रकरणात कारवाई

बंगळुरू: फसवणुकीच्या एका प्रकरणात केंद्रीय अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री प्रल्हाद जोशी यांचा भाऊ गोपाळ जोशी याला पोलिसांनी शनिवारी अटक केली. आपल्याला दोन कोटी रुपयांना फसविल्याची तक्रार जनता दल (एस) या पक्षाच्या माजी आमदाराच्या पत्नीने पोलिसांकडे केली होती.

माजी आमदार देवानंद फुलसिंह चव्हाण यांच्या पत्नी सुनिता चव्हाण यांनी गोपाळ जोशी व इतरांविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल केली होती. मेमध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकांत भाजपची उमेदवारी मिळवून देतो असे सांगून माझ्याकडून गोपाळ जोशी याने २ कोटी रुपये उकळले होते असे चव्हाण यांनी या तक्रारीत म्हटले होते.

दरम्यान, आपण तीन दशकांपेक्षा जास्त काळापूर्वीच गाेपाळ यांच्याशी संबंध ताेडले हाेते, असे प्रल्हाद जाेशी यांनी सांगितले.

Web Title: Union Minister Prahlad Joshi brother arrested; Proceedings in a case of fraud