Uncle killed his niece by raping her in the farm | कुरकुरेचं आमिष दाखवून भाचीला नेलं शेतात अन् बलात्कार करून मामाने केली हत्या

कुरकुरेचं आमिष दाखवून भाचीला नेलं शेतात अन् बलात्कार करून मामाने केली हत्या

ठळक मुद्दे ही घटना मुजफ्फरपूरमधील सैया पोलिस स्टेशन परिसरातील एका खेड्यातील आहे. जेथे संध्याकाळी 11 वर्षाची मुलगी इतर मुलांसमवेत खेळत होती.

बिहारमध्ये कलयुगातील काकाने आपल्या भाचीवर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या केली. कुरकुरे देण्याचा आमिष दाखवून मामाने भाचीला शेतीत नेले. त्यानंतर त्याने दुष्कृत्य केले. रात्रभर कुटुंबीय मुलीचा शोध घेत राहिले. सकाळी शेतातील मुलीच्या मृतदेहाची माहिती ग्रामस्थांनी दिली.

ही घटना मुजफ्फरपूरमधील सैया पोलिस स्टेशन परिसरातील एका खेड्यातील आहे. जेथे संध्याकाळी 11 वर्षाची मुलगी इतर मुलांसमवेत खेळत होती. मग तिच्या मामाने तिला कुरकुरेच्या आमिषाने शेतात नेले. जिथे तिच्यावर बलात्कार करून हत्या करण्यात आली. रात्री कुटुंबीयांनी शोध घेतला. पण मुलगी सापडली नाही. नंतर दुसऱ्या दिवशी मुलीचा मृतदेह शेतात पडून असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. यानंतर कुटुंबीयांनी पोलिसांना माहिती दिली. घटनास्थळी पोहोचताच पोलिसांनी मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठविला. त्याचवेळी पोलिसांनी मृत मुलाच्या मामाला अटक केली असता त्याने आपला गुन्हा कबूल केला.

शेजारी राहणाऱ्या कपिल देव राय यांनी सांगितले की, सोमवारी सायंकाळी सातच्या सुमारास ही मुलगी घराजवळच इतर मुलांसमवेत खेळत होती. मग तिचा मामा विजय शर्मा आला आणि कुरकुरेचे आमिषाने तिला शेतात  घेऊन जात होता. त्यावेळी गावकऱ्यांनी विरोध केला पण तो ऐकला नाही आणि आपल्याबरोबर घेऊन गेला. कपिल देव राय यांनी एसएसपीला ही संपूर्ण माहिती सांगितल्यानंतर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेत त्याच्याकडे चौकशी केली. त्यानंतर आरोपीने गुन्हा मान्य केला. 

त्याचवेळी घटनास्थळावरून मुलीचे कपडे आणि कुरकुरेचे एक पाकिट जप्त करण्यात आले आहे. एसएसपी जयंत कांत यांनी सांगितले की, अल्पवयीन मुलीसोबत बलात्काराची घटना घडली आहे. ज्यामध्ये तातडीने कारवाई करत पोलिसांनी स्थानिक लोकांचे जबाब नोंदवून घेतले. नंतर, मुलीच्या मामाला अटक करण्यात आली. अटकेनंतर त्याने गुन्हा कबुल केला आहे. फॉरेन्सिक टीम घटनास्थळी आली होती असून या प्रकरणाचा तपास करत आहे.

Web Title: Uncle killed his niece by raping her in the farm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.