शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
4
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
5
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
6
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
7
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
8
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
9
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
10
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
11
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
12
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
13
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
14
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
15
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
16
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
17
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
18
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
19
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
20
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 

वाळूज येथे गुंगी आणि नशा आणणाऱ्या औषधांचा बेकायदा साठा जप्त 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2018 18:13 IST

आरोपीकडून तीन धारदार तलवारी आणि सुमारे २८ हजार ८९६ रुपयांची विविध कंपन्यांच्या औषधी गोळ्यांचा साठा जप्त करण्यात आला.

ठळक मुद्देपोलीस आणि अन्न व औषध प्रशासनाने केली संयुक्त कारवाई 

औरंगाबाद : गुंगी आणि नशा आणणाऱ्या औषधांचा बेकायदा साठा आणि  तलवारीसह एका जणाला दहशतवाद विरोधी सेल आणि अन्न व प्रशासन विभागाने संयुक्त कारवाई करून अटक केली. आरोपीकडून तीन धारदार तलवारी आणि सुमारे २८ हजार ८९६ रुपयांची विविध कंपन्यांच्या औषधी गोळ्यांचा साठा जप्त करण्यात आला. आरोपीविरोधात एमआयडीसी वाळूज ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती. 

सय्यद नबी उर्फ सय्यद लाल(३२,रा.भारतनगर, रांजणगाव शेणपुंजी)असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. याविषयी अधिक माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, भारतनगर येथील रहिवासी सय्यद नबी उर्फ सय्यद लाल हा गुंगी  आणि नशेच्या गोळ्या  बेकायदेशीर विक्री करतो.त्याच्याकडे या गोळ्यांच्या साठा असल्याची   माहिती खबऱ्याने दहशतवाद विरोधी सेलचे प्रमुख पोलीस  उपनिरीक्षक योगेश धोंडे यांना दिली. त्यानंतर पोलीस उपायुक्त डॉ. दीपाली धाटे-घाडगे, सहायक आयुक्त हनुमंता भापकर, यांच्या मार्गदर्शनाखाली  विशेष शाखेचे निरीक्षक शेषराव उदार, उपनिरीक्षक धोंडे, उपनिरीक्षक रेश्मा सौदागर, सहायक उपनिरीक्षक गोरख चव्हाण, युनूस पठाण,गौतम गंगावणे,  दीपक इंगळे चालक अंबादास दौड  यांनी औषधी निरीक्षक वर्षा प्रवीण महाजन आणि राजगोपाल बजाज यांना सोबत घेऊन सोमवारी सकाळी आरोपीच्या घरावर छापा मारला.

यावेळी त्याच्या घरातील लोखंडी पेटीत अल्प्राकॅन नावाच्या २हजार ७०० गोळ्या, स्पास्मो-ए होन प्लस कॅप्सूलचे २६ बॉक्स ज्यात ३ हजार ७४४ गोळ्या,  स्पास्मो प्रॉक्स होन प्लस नावाच्या ४८० कॅप्सूल गोळ्या,  स्पास्मो-प्रॉक्सहोन प्लस कॅप्सूल चे रिकामे ६ बॉक्स असा सुमारे २८ हजार ८९६ रुपयांचा औषधी साठा मिळाला.  यासोबतच आरोपीच्या घरझडतीत २ फुट ९ इंच लांबीची धारदार तलवार, २ फुट ५ इंचची दुसरी धारदार तलवार आणि १ फुट ९ इंच लांबीची अन्य एक तलवार अशा सुमारे तीन तलवारी आढळल्या. 

टॅग्स :ArrestअटकCrime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबादPoliceपोलिसFood and Drug administrationअन्न व औषध प्रशासन विभाग