शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अधिकाऱ्याकडे सापडली बेहिशेबी मालमत्ता, गोव्यात सीबीआयची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2023 14:27 IST

उपलब्ध माहितीनुसार, २०१६ ते २०२३ या कालावधीमध्ये या अधिकाऱ्याने मोठ्या प्रमाणावर संपत्ती गोळी केल्याचे दिसून आले.

मुंबई : महालेखापाल कार्यालयात सहायक लेखा अधिकारी पदावर गोवा येथे कार्यरत असलेल्या अधिकाऱ्याकडे एक कोटीपेक्षा जास्त मूल्याची संपत्ती सापडली आहे. या अधिकाऱ्याने नाव जॉर्ज वर्गिस असे  आहे. उपलब्ध माहितीनुसार, २०१६ ते २०२३ या कालावधीमध्ये या अधिकाऱ्याने मोठ्या प्रमाणावर संपत्ती गोळी केल्याचे दिसून आले. २०१६ पूर्वीपर्यंत त्याच्या संपत्तीचा तपास सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी केला असता त्याच्या मालकीचे केरळ येथे एक दुकान असल्याचे दिसून आले. मात्र, २०१६ ते २०२३ या कालावधीमधील त्याच्या मालमत्तेची तपासणी केली असता त्याच्याकडे गोव्यात एक ५० लाख रुपये किमतीचा बंगला, केरळात एक दुकान, केरळमध्येच २५ लाख रुपये किमतीची एक कृषी जमीन, १३ लाख रुपये किमतीची ऑडी, एक आय-२० गाडी, २ लाख रुपये किमतीच्या दोन दुचाकी आदी गोष्टी त्याच्याकडे आढळून आल्या.सात वर्षांत  त्याचे उत्पन्न, ठेवी आदींच्या माध्यमातून १ कोटी २१ लाखांचे व्यवहार झाल्याचे दिसून येते. याच कालावधीत त्याचा खर्च ७४ लाख ७६ हजार होता. उत्पन्नाखेरीज त्याने ४७ लाख रुपयांचे अतिरिक्त व्यवहार केल्याचे दिसून आले. त्याच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :CBIगुन्हा अन्वेषण विभागCrime Newsगुन्हेगारीraidधाडgoaगोवा