शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅक टू बॅक! उद्धव ठाकरे कणकवलीत सभा घेणार, दुसऱ्याच दिवशी राज यांचीही तोफ धडाडणार
2
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
3
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
4
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
5
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा
6
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 
7
SPARC shares: १४ दिवसांपासून घसरत होता शेअर, ४९% नी आपटला; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
8
"ज्या बूथवर काँग्रेसला एक मतही मिळणार नाही, तिथे 25 लाखांची विकासकामं केली जातील"
9
उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका; रोजच्या आहारात करा आवश्यक बदल!
10
"अनंत गीतेंचे आयुष्य धर्माच्या नावाखाली निवडणूक लढण्यात गेले, ही निवडणूक भवितव्य घडवणारी"
11
'उर्दू भाषेसोबत अन्याय का?' संजय लीला भन्साळींची 'हीरामंडी'सीरिज पाहून भडकला शीजान खान
12
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!
13
तुम्हाला ‘श्री स्वामी समर्थ’ नामाचा अर्थ माहिती आहे का? प्रभावी मंत्र अन् सुखी जीवनाची वचने
14
कोव्हिशिल्ड साईड इफेक्ट: दोन मृत मुलींचे पालक सीरम इन्स्टिट्यूटला कोर्टात खेचणार
15
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : उद्धव ठाकरेंकडूनच कोल्हापूरच्या गादीचा अपमान, उदय सामंत यांचा आरोप
16
सर्पदंशाने तरुणाचा मृत्यू; जिवंत करण्यासाठी मृतदेह दोन दिवस गंगेच्या पाण्यात लटकवला...
17
ठाकरे गटाला पॉर्न संस्कृती रुजवायची आहे का? चित्रा वाघ यांचा हल्लाबोल
18
Rahul Gandhi : "न रहेगा बांस, न बजेगी बांसुरी म्हणजे सरकारी नोकऱ्या नाहीत, आरक्षण नाही"; राहुल गांधींचा घणाघात
19
उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची माफी; "आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."
20
Lok Sabha Election 2024: लोकसभेला 'मविआ' किती जागा जिंकणार? विधानसभा निवडणुकीत काय घडणार? Jayant Patil यांनी केले २ मोठे दावे

धक्कादायक ! बलात्काराचा गुन्हा दाखल केल्यावर विवाहित महिलेचा ' यू टर्न ',इंदापूर तालुक्यातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: July 01, 2020 1:02 AM

खोटी फिर्याद देणाऱ्या  विवाहितेवर कडक कारवाई करण्याचे न्यायालयाचे आदेश

ठळक मुद्देगुन्हा दाखल झाल्यानंतर बलात्कार झाला नसल्याचे विवाहितेचे प्रतिज्ञापत्र

बारामती : गुन्हा दाखल झाल्यानंतर ‘यु टर्न’ घेत बलात्कार  झाला नसल्याचे प्रतिज्ञापत्र संबंधित महिलेने सादर केले.  हातऊसने घेतलेल्यापैशाच्या कारणावरून बलात्काराची खोटी फिर्याद या महिलेने वालचंदनगर पोलीस ठाण्यात दिली होती. बारामती सत्र न्यायालयाने या महिलेला फटकारत पोलिसांना तिच्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले. इंदापुर तालुक्यातील एका गावातील विवाहितेने वालचंदनगर पोलिसठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली होती.त्यानुसार  तिने व तिच्या पतीने या आरोपीकडून हात ऊसने पैसे घेतले होते. मात्र, हे  पैसे मुदतीत न दिल्याने त्याने पैशाचा तगादा लावत फियार्दी विवाहितेकडे शारिरिक संबंधाची मागणी करीत तिच्यावर वेळोवेळी बलात्कार केला. दि. ७ जून रोजी रात्री साडे नऊ वाजता तिच्या घरी अनाधिकाराने घुसत पती घरात नसताना तिच्यावर बलात्कार केल्याचे तिने फिर्यादीमध्ये नमुद केले होते. त्यानुसार आरोपीवर गुन्हा दाखल करीत  वालचंदनगर पोलिसांनी प्रकरणाचा तपास सुरु केला.मात्र, त्यानंतर तपासादरम्यान या विवाहितेने ‘यू टर्न ’ घेत प्रतिज्ञापत्राद्वारे  बलात्कार झाला नसल्याचे सांगत केवळ पैशाचा तगादा लावत असल्याने फिर्याद दिल्याचे  सांगितले.या प्रकरणातील  आरोपीने बारामती सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. या अर्जाची सुनावणी जिल्हा न्यायाधिश आर. आर. राठी यांच्यासमोर सुुरु होती. या प्रकरणात सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकिल प्रसन्न जोशी यांनी संबंधित फिर्यादी  महिलेने दिलेला मूळ जबाबातील विसंगती. नवे प्रतिज्ञापत्र न्यायालयासमोर आणले.संबंधित महिलेने खोटा गुन्हा दाखल करुन पोलीस यंत्रणा व न्याय यंत्रणेचा वेळ व पैसा खर्च केल्याचे अ‍ॅड. जोशी यांनी निदर्शनास आणले.त्यावर न्यायाधीश राठी यांनी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून  आरोपीचा सशर्त जामिन न्यायाधिश मंजूर केला. विनाकारण न्यायालय व पोलिस यंत्रणेचा वेळ खर्ची घातल्याचे निरीक्षण नोंदवत तिच्याविरोधात कडक कारवाई करावी, असे आदेश देखील त्यांनी दिले.अशा प्रकरणांमध्ये आरोपीला विनाकारण न्यायासाठी झगडावे लागल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.———————————————

टॅग्स :BaramatiबारामतीIndapurइंदापूरWomenमहिलाRapeबलात्कारPoliceपोलिसCourtन्यायालय