शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

दोन तरुणांनी गळा दाबून रूम पार्टनरला संपवलं; हत्येचं कारण कळताच पोलीसही हादरले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2024 12:02 IST

तरुणाच्या मृत्यूनंतर इतर दोन रूम पार्टनर गायब असल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं. त्यानंतर पोलिसांनी त्यांचा शोध घेत दोघांनाही ताब्यात घेतलं.

नवी दिल्ली : दिल्लीतील निहाल विहार परिसरात खळबळजनक घटना घडली आहे. पिण्याचं पाणी दिलं नाही म्हणून तरुणाने एका अल्पवयीन मुलाच्या मदतीने गळा दाबून रूम पार्टरनची हत्या केली. रचित असं मृत तरुणाचं नाव असून तो मूळचा उत्तर प्रदेशातील हरदोई येथील रहिवासी होता. खून केल्यानंतर पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी आरोपींनी ही आत्महत्या दाखवण्यासाठी तरुणाच्या मृतदेहाला एका दोरीने पंख्याला लटकवलं. मात्र पोलिसांच्या ही बाब लक्षात आली आणि त्यांनी आरोपींना बेड्या ठोकल्या.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ११ जानेवारी रोजी लक्ष्मी पार्क परिसरात एका तरुणाने आत्महत्या केल्याची माहिती प्राप्त झाली होती. घटनास्थळी पोहोचल्यानंतर तरुणाचा मृतदेह पंख्याला लटकलेला असल्याचं आढळून आलं. मात्र छताची उंची जास्त होती आणि आसपास खुर्ची वगैरे काहीच न आढळल्याने पोलिसांना शंका आली. त्यामुळे पोलिसांनी तरुणाचा मृतदेह खाली घेत याप्रकरणी तपास सुरू केला.

पोलिसांना तपासादरम्यान तरुणाच्या गळ्यावर खुना आढळून आल्या. त्यानंतर तरुणाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला. मृत रचित आणि त्याचे दोन रूम पार्टनर एका ट्रान्सफार्मर बनवणाऱ्या कंपनीत कामाला होते, अशी माहिती रुमच्या मालकाने दिली. मात्र रचितच्या मृत्यूनंतर इतर दोन रूम पार्टनर गायब असल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं. त्यानंतर पोलिसांनी त्यांचा शोध घेत दोघांनाही ताब्यात घेतलं.

दरम्यान, घटनेच्या दिवशी आम्ही तिघेही नशेत होतो. तेव्हा आम्ही रचितला पिण्यासाठी पाणी मागितलं. मात्र त्याने ते देण्यास नकार दिल्याने आम्ही त्याची हत्या केली, अशी कबुली आरोपींनी दिली आहे. याप्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

टॅग्स :delhiदिल्लीPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी