धक्कादायक! दुधासाठी रडत होती २ वर्षांची चिमुरडी; आईच्या प्रियकरानं केली निर्घृण हत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2022 16:17 IST2022-02-08T16:17:14+5:302022-02-08T16:17:25+5:30
घटस्फोटानंतर प्रियकरासोबत राहणाऱ्या महिलेच्या मुलीची हत्या; डोक्याला दुखापत झाल्यानं चिमुरडी दगावली

धक्कादायक! दुधासाठी रडत होती २ वर्षांची चिमुरडी; आईच्या प्रियकरानं केली निर्घृण हत्या
मुंबई: मुंबईजवळ असलेल्या भाईंदरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका २१ वर्षीय प्रियकरानं त्याच्या प्रेयसीची मुलीची हत्या केली आहे. दोन वर्षींची चिमुरडी दुधासाठी रडत असल्यानं प्रियकरानं तिला संपवलं.
पूजा वाघ नावाची तरुणी तिच्या २ वर्षीय मुलगी सोनाली सोबत राहायची. तिचा प्रियकर आदिल मुनावर खानदेखील त्यांच्यासोबत राहायचा. आरोपी खानसोबत राहायला आली तेव्हा पूजा ३ महिन्यांची गर्भवती होती. पूजाला ६ वर्षांची मोठी मुलगी आहे. ती वडिलांसोबत राहते. पूजाचा घटस्फोट झाला आहे.
पूजा एका केटरिंग कंपनीत काम करते. सोमवारी रात्री घरातून निघताना तिनं सोनालीची जबाबदारी प्रियकर आदिलकडे सोपवली होती. सकाळी आदिलनं पूजाला कॉल केला. सोनालीच्या डोक्यात जखम होऊन बराच रक्तस्राव झाल्याचं त्यानं सांगितलं. आपण मोबाईलवर गेम खेळत असताना सोनाली पडल्याचं खोटी कहाणी त्यानं रचली.
सोनालीवर रुग्णालयात उपचार सुरू असल्यानं आदिलनं सांगताच पूजानं रुग्णालय गाठलं. मात्र डॉक्टरांनी सोनालीला मृत घोषित केलं. सोनालीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्यानं आणि खूप रक्त गेल्यानं सोनाली दगावल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. डॉक्टरांनी घटनेची माहिती स्थानिक पोलिसांना दिली. सोनाली दुधासाठी रडायची तेव्हा आदिल तिला मारायचा असं पूजानं सांगितलं.