शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाजवळ दुचाकीस्वाराला लुटले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2021 10:47 IST

शहरात खळबळ : कोयत्याने मारहाण करून रोकड असलेली बॅग पळवली

ठळक मुद्देपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे शहरातील औषध मेडिकल दुकानांवर जाऊन औषध विक्रेत्यांच्या मागणीनुसार मालाची नोंदणी करून त्याची रक्कम संकलित करतात.

पिंपरी : शहरात जबरी चोरीचे गुन्हे वाढतच असून चिंचवड येथे पोलीस आयुक्तालया जवळील रस्त्यावर एका दुचाकीस्वाराला कोयत्याने मारहाण करून तिघांनी लुटल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पोलीस आयुक्तालय परिसरात ही घटना घडल्याने शहरवासीयांमध्ये भीतीचे वातावरण आहे. शैलसिंह मोहनसिंग (वय २९, रा. वाल्हेकरवाडी रोड, पंचरत्न कॉलनी, चिंचवड) यांनी या प्रकरणी सोमवारी (दि. १५) चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तीन अनोळखी दुचाकीस्वार आरोपींविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे शहरातील औषध मेडिकल दुकानांवर जाऊन औषध विक्रेत्यांच्या मागणीनुसार मालाची नोंदणी करून त्याची रक्कम संकलित करतात. फिर्यादी हे रविवारी (दि. १४) नेहमीप्रमाणे त्यांचे दिवसभराचे काम संपवून रात्री साडेआठ ते नऊच्या दरम्यान चिंचवड येथे प्रेमलोक पार्क ते बिजलीनगर पाणवठ्याजवळून दुचाकीवरून जात होते. त्यावेळी रस्त्यातील गतिरोधक त्यांनी त्यांच्या दुचाकीचा वेग कमी केला. त्यावेळी एका दुचाकीवरून आलेल्या तीन अनोळखी आरोपींनी त्यांच्यावर हल्ला केला. त्यामुळे फिर्यादी दुचाकीवरून खाली पडले. आरोपींनी कोयत्याने मारहाण केली. त्याला फिर्यादीने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. मात्र आरोपींनी दुखापत करून फिर्यादीकडील बॅग जबरदस्तीने हिसकावून नेली. २५० रुपये किमतीचे बॅग, त्यात ते ३३ हजार रुपयांची रोख रक्कम, सात हजार रुपये किमतीचा मोबाईल, असा एकूण ४० हजार २५० रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी जबरदस्तीने हिसकावून चोरून नेला. चिंचवडचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू ठुबल तपास करीत आहेत.

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या मागच्या बाजूला असलेल्या रस्त्यावर लुटमारीचा हा प्रकार घडला. पोलीस आयुक्तालयात जवळील या घटनेने खळबळ उडाली असून, पोलिसांनी वेगात तपास सुरू केला आहे. त्यानुसार तेथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या फुटेजची पाहणी करण्यात आली. घटनास्थळ परिसरातील एका कॅमेऱ्याचे फुटेज हे कृष्णधवल (ब्लॅक अँड व्हाईट) आहेत. तसेच मुख्य रस्त्यावरील का कॅमेर्‍यामध्ये तीन जण एका दुचाकीवरून जात असल्याचे दिसून येत आहे. मात्र रात्रीची वेळ असल्याने दुचाकीचा क्रमांक व दुचाकीस्वारांची चेहरे स्पष्ट होत नसल्याने आणखी सीसीटीवी फुटेज तपासण्यात येणार आहेत.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी