शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

मामुर्डीतील दुचाकीस्वाराचा अपघात नव्हे, घातपात करून केला खून

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2019 20:40 IST

तळेगाव दाभाडे पोलीस : शवविच्छेदन अहवालामुळे गुन्हा उघडकीस

पिंपरी : दुचाकी अपघातात मृत्यू झाल्याप्रकरणी पोलिसांकडे नोंद करण्यात आली होती. मात्र हा अपघाती मृत्यू नसून खून असल्याचे शवविच्छेदन अहवाल तसेच तपासाच्या इतर बाबींतून समोर आले आहे. मावळ तालुक्यातील मामुर्डी गावाच्या हद्दीत मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाच्या सेवा रस्त्यालगत मृतदेह आढळला होता. याप्रकरणी खुनाचा गुन्हा तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दामोदर तुकाराम फाळके (वय ४७, रा. गहुंजे, ता. मावळ) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक नीलेश बोकेफोडे यांनी फिर्याद दिली आहे. द्रुतगती मार्गाच्या सेवा रस्त्याच्या लगत दामोदर फाळके यांचा २३ नोव्हेंबर २०१९ रोजी मृतदेह आढळून आला होता. दुचाकीवरून पडून गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाल्याबाबत मुलगा वेदांत दामोदर फाळके याने पोलिसांकडे खबर दिली होती. त्यानुसार तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली होती. मात्र शवविच्छेन अहवाल व इतर तपासाच्या बाबींतून हा मृत्यू अपघाती नसून घातपात असल्याचे समोर आले. शवविच्छेदनापूर्वी आठ ते १२ तास आधी दामोदर फाळके यांचा मृत्यू झाल्याचे अहवालातून निष्पन्न झाले आहे. तसेच फाळके यांनी मद्यप्राशन किंवा तत्सम अंमली पदार्थाचे सेवन केले नसल्याचा अभिप्राय वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिला आहे. त्यामुळे फाळके यांचा अपघाती मृत्यू झाला नसून, दि. २२ नोव्हेंबर २०१९ रोजी द्रुतगती मार्गाच्या सेवा रस्त्याने दुचाकीवरून जात असताना अज्ञात व्यक्तिने अज्ञात कारणावरून टणक व बोथट हत्याराने फाळके यांच्या डोक्यात मारून गंभीर जखमी करून त्यांचा खून केला असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.

टॅग्स :mavalमावळCrime Newsगुन्हेगारीMurderखूनPoliceपोलिस