अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक; मंचर येथील दाम्पत्याचा जागीच मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2021 21:37 IST2021-11-28T21:36:56+5:302021-11-28T21:37:21+5:30

मंचर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मूळचे नारोडी येथील एकनाथ बबनराव नाईक व संगीता एकनाथ नाईक हे दोघे कामानिमित्त चाकण येथे राहतात.

Two-wheeler hit by unknown vehicle; The couple from Manchar died on the spot | अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक; मंचर येथील दाम्पत्याचा जागीच मृत्यू

अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक; मंचर येथील दाम्पत्याचा जागीच मृत्यू

मंचर - दुचाकीला अज्ञात वाहनाने पाठीमागून धडक देऊन झालेल्या अपघातात पती-पत्नी ठार झाले आहेत. हा अपघात मंचर घोडेगाव रस्त्यावर वडगाव काशिंबेग गावच्या हद्दीत भीमाशंकर हॉस्पिटलसमोर आज सकाळी साडेअकरा वाजता झाला. एकनाथ बबनराव नाईक (वय 47)व  संगीता एकनाथ नाईक (वय 42 दोघे रा. नारोडी) असे अपघातात ठार झालेल्या पती-पत्नीचे नाव आहे.

मंचर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मूळचे नारोडी येथील एकनाथ बबनराव नाईक व संगीता एकनाथ नाईक हे दोघे कामानिमित्त चाकण येथे राहतात. एकनाथ हा माथाडीमध्ये कामाला होता. रविवारी सुट्टी असल्याने ते गावाला येत होते. आज सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास मंचर घोडेगाव रस्त्यावर वडगाव काशिंबेग गावच्या हद्दीतील भीमाशंकर हॉस्पिटलसमोर नाईक हे पत्नीला घेऊन मोटरसायकल क्रमांक एम एच 14 डी क्यू 5604  वरून मंचर बाजूकडून घोडेगाव बाजूकडे चालले होते.त्यावेळी मागून वेगात आलेल्या अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला पाठीमागून धडक दिली.या अपघातात एकनाथ बबनराव नाईक व संगीता एकनाथ नाईक हे दोघे पती-पत्नी गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी मंचर उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. उपचार सुरू असताना दोघे ठार झाले आहेत. यासंदर्भात सावता दत्तात्रय नाईक यांनी मंचर पोलिसात फिर्याद दिली आहे. अपघातास कारणीभूत ठरलेल्या अज्ञान वाहन चालकांविरोधात मंचर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास मंचर पोलीस करत आहेत.

Web Title: Two-wheeler hit by unknown vehicle; The couple from Manchar died on the spot

टॅग्स :Accidentअपघात