सफाईच्या कामावरून दोघांवर केला रॉडने हल्ला; एकाची मृत्यूशी झुंज; दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2023 08:33 AM2023-05-26T08:33:14+5:302023-05-26T08:33:20+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क उल्हासनगर : कॅम्प नं. १, शहाड परिसरात सफाईच्या कामावरून चौकडीने सोमवारी पहाटे ४ वाजता दोघांवर लोखंडी ...

Two were attacked with a rod for cleaning work; One's fight to the death; Both were arrested | सफाईच्या कामावरून दोघांवर केला रॉडने हल्ला; एकाची मृत्यूशी झुंज; दोघांना अटक

सफाईच्या कामावरून दोघांवर केला रॉडने हल्ला; एकाची मृत्यूशी झुंज; दोघांना अटक

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
उल्हासनगर : कॅम्प नं. १, शहाड परिसरात सफाईच्या कामावरून चौकडीने सोमवारी पहाटे ४ वाजता दोघांवर लोखंडी रॉडने हल्ला करून गंभीर जखमी केले. जखमींपैकी सुनील निकम मुंबई येथील रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत असून, उल्हासनगर पोलिसांनी भोला कनोजिया व चिंटू चंडालिया यांना अटक केली.

उल्हासनगर कॅम्प नं. १ शहाड परिसरात सफाई कामाच्या वादातून सोमवारी पहाटे ४ वाजता नितीन कनोजिया, भोला कनोजिया, चिंटू चंडालीया व एका अनोळखी सहकाऱ्याने सोनू शर्मा व सुनील निकम यांच्या डोक्यावर लोखंडी रॉडने हल्ला केला. या हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी झाले. उल्हासनगर पोलिसांनी  दोघांनाही मध्यवर्ती रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. दरम्यान, सुनील निकम यांची तब्येत खालावली असून तो मुंबईतील रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे. 

उल्हासनगर पोलिसांत नितीन कनोजिया, भोलू कनोजिया, चिंटू चंडालिया व एका अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल केला असून, चिंटू व भोला यांना  अटक केली. भोलाची गेल्याच महिन्यात तडीपारीची शिक्षा संपल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिलीप फुलपगारे यांनी दिली.  

Web Title: Two were attacked with a rod for cleaning work; One's fight to the death; Both were arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.