दहिवदजवळ स्पिरीटची हेराफेरी करताना २ टँकर पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2021 23:02 IST2021-10-08T23:02:29+5:302021-10-08T23:02:53+5:30
इंदौरकडून येणारे स्पिरीटने भरलेले टँकर मरावी उपकेंद्राजवळील हॉटेल करणीच्या प्रांगणात उभे होते़

दहिवदजवळ स्पिरीटची हेराफेरी करताना २ टँकर पकडले
लोकमत न्यूज नेटवर्क
शिरपूर : मुंबई-आग्रा महामार्गावरील दहिवद गावाजवळील मरावी उपकेंद्रासमोरील एका हॉटेलच्या प्रांगणात स्पिरीटची हेराफेरी करतांना २ टँकर पोलिसांनी पकडले़.
८ रोजी दुपारी ३़३० ते ४ वाजेच्या सुमारास पोलिसांनी स्पिरीटची हेराफेरी करीत असतांना रंगेहात पकडले. आयजी पथकाचे प्रमुख पोनि हेमंत पाटील, शिरपूर पोलिस ठाण्याचे पोनि रविंद्र देशमुख व सांगवी पोलिस ठाण्याचे सपोनि सुरेश शिरसाठ व पोलिस पथकाने हा छापा टाकला.
इंदौरकडून येणारे स्पिरीटने भरलेले टँकर मरावी उपकेंद्राजवळील हॉटेल करणीच्या प्रांगणात उभे होते़ काहीवेळानंतर एक जीप येवून हॉटेलच्या पाठीमागे गेली, त्यानंतर ते दोघे टँकर सुध्दा गेलेत़ टँकरमधून स्पिरीटची हेराफेरी होत असतांना अचानक पोलिसांनी छापा टाकला़ त्यावेळी काही संशयित पसार झाले, तर २ जणांना ताब्यात घेण्यात आले़ घटनास्थळी हेरोफेरी करण्यासाठी लागणारे रिकामे प्लॅस्टिक ड्रम, स्पिरीट खाली करण्यासाठी लागणारी नळी आदी साहित्य जप्त करण्यात आले़