शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
5
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
6
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
7
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
8
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
9
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
10
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
11
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
12
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
13
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
14
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
15
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
16
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
17
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
18
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
19
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
20
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य

Corona Virus Remdesivir: रेमडीसीव्हरचा काळा बाजार करणारे दोघे अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2021 17:33 IST

21 Remdesivir Drug caught in thane black market: कोरोना रुग्णांसाठी रेमडीसीव्हर हे गरजेचे औषध आहे. परंतु सध्या राज्यात त्याचा तुटवडा जाणवत आहे. तर काही ठिकाणी त्याचा काळाबाजार सुरु आहे. ठाण्यात २१ रेमडीसीव्हर हस्तगत.

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे  : कोरोना रुग्णांसाठी रेमडीसीव्हर हे गरजेचे औषध आहे. परंतु सध्या राज्यात त्याचा तुटवडा जाणवत आहे. तर काही ठिकाणी त्याचा काळाबाजार सुरु आहे. अशाच प्रकारे ठाण्यात रेमडीसीव्हरचा काळा बाजार करणाऱ्यासाठी तीनहात नाका, इंटरनिटी मॉल येथे काही जण येणार असल्याची माहिती ठाणो खंडणी विरोधी पथकाला मिळाली होती. त्यानुसार त्यांनी सापळा रचुन एका इसमास रंगहात पकडले आहे. या व्यक्तीकडून एक इंजेक्शन ५ ते १० हजार रुपयांना विकले जात होते. त्यानुसार त्याच्याकडून १६ इंजेक्शन ताब्यात घेण्यात आली आहेत. तर बाळकुम नाका येथून देखील अन्य एकास ५ इंजेक्शसह ताब्यात घेण्यात आले आहे.

       या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आतीफ परोग अंजुम (२२) रा. कुर्ला मुंबई आणि प्रमोद ठाकुर (३१) रा. ठाकुरपाडा, भिंवडी अशी आहेत. १० एप्रिल रोजी तीन हात नाका आणि बाळकुम येथे दोघे रेमडीसीव्हरची इंजेक्शन घेऊन येणार असल्याची माहिती ठाणो खंडणी विरोधी पथकाला मिळाली होती. त्यानुसार तीन हात नाका आणि बाळकुम येथे सापळा रचून या दोघांना अटक करण्यात आली आहे. हे दोघेही रेमडीसीव्हर ५ ते १० हजारांना विकत असल्याची माहिती देखील आता समोर आली आहे. त्या दोघांकडून पोलिसांनी अनुक्रमे १६ आणि ५ अशी २१ रेमडीसीव्हरची इंजेक्शन ताब्यात घेण्यात आल्याची माहिती खंडणी विरोधी पथकाने दिली.

पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सह पोलीस आयुक्त सुरेश मेकला यांच्यासह इतर प्रमुख अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकाचे वरीष्ठ पोलीस निरिक्षक राजकुमार कोथमिरे यांच्या पथकाने केली. दरम्यान अटक करण्यात आलेल्या आरोपींच्या विरोधात जीवनावश्यक वस्तु अधिनियम १९९५ चे उल्लघंन, दंडनिय कलम ७ (१) (ए) कलम १८ - बी व कलम २२ (१) (सीसीए), औषध प्रसाधन कायदा १९४० चे कलम १८ (सी) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस