ठाण्यातील सेक्स रॅकेटमधून दोन रशियन मुलींची सुटका

By जितेंद्र कालेकर | Updated: May 18, 2023 21:50 IST2023-05-18T21:50:26+5:302023-05-18T21:50:35+5:30

ठाणे गुन्हे शाखेची कारवाई, आरोपी पसार

Two Russian girls rescued from sex racket in Thane | ठाण्यातील सेक्स रॅकेटमधून दोन रशियन मुलींची सुटका

ठाण्यातील सेक्स रॅकेटमधून दोन रशियन मुलींची सुटका

जितेंद्र कालेकर, ​​लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: ठाण्यातील वागळे इस्टेट भागातून एका सेक्स रॅकेटमधून दोन रशियन मुलींची सुटका करण्यात ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाला यश आल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेश पाटील यांनी गुरुवारी दिली.

या कारवाईची चाहूल लागताच या तरुणींना देह व्यापारासाठी आणणारा त्यांचा दलाल मात्र पसार झाला आहे. ठाणे शहर परिसरात पीडित तसेच विदेशी मुलींना देहविक्रीसाठी तयार करून वेगवेगळया ठिकाणी पाठविले जाते, अशी माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या पथकाला मिळाली होती. त्याआधारे १७ मे रोजी वागळे इस्टेट येथील द्वारका हॉटेलच्या स्वागत कक्षात बनावट ग्राहक पाठवून पोलिसांनी छापा मारला. या छाप्यात दोन पीडित रशियन मुलींची सुटका केली आहे. यातील आरोपी दलाल रमण हा पसार झाला असून, त्याच्याविरुद्ध अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक अधिनियमाखाली वागळे इस्टेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

Web Title: Two Russian girls rescued from sex racket in Thane