कोल्हापूर - एटीएम मशीनला स्कीमर बसवून जगभरातील विविध बँकांतील ग्राहकांच्या खात्यावरील आॅनलाईन सिस्टीम हॅक करुन त्यावरुन कोट्यावधी रुपये लुटणाऱ्या दोघा रोमानियन परदेशी हॅकर्सना शाहुपूरी पोलीसांनी शिताफीने काल मध्यरात्री अटक केली. संशयित आरोपी पीरजोल एमनॉईल (वय ४०) आणि सिपोस वासिले लॉर्डियन (वय ३७) अशी त्यांची नावे आहेत. या दोघांनी गोवा राज्यातील पेडणे पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एका दिवसात चार एटीएम मशीनवरुन आॅनलाईनद्वारे रोकड लुटल्याच्या तक्रारी दाखल झाल्या आहेत. तेथून हे दोघे पोलीसांना चकवा देवून कोल्हापूरला पळून आले होते. येथील एका पंचतारांकित हॉटेलवर उतरल्याची माहिती मिळालेनंतर त्यांच्या मुसक्या आवळण्यात आल्या. त्यांनी आतापर्यंत सात ठिकाणाहून एटीएमद्वारे ग्राहकांचे पैसे परस्पर काढून घेतलेची कबुली दिली आहे.
कोट्यवधी रुपये लुटणाऱे दोन रोमानियन हॅकर्स पोलिसांच्या जाळ्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2018 15:11 IST