शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

Video : एसीबीच्या जाळ्यात रेशनिंगचे दोन क्लार्क अडकले; प्रत्येक रेशन कार्डसाठी मागितली ५०० रुपयांची लाच

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2021 20:08 IST

ACB Trape : अंबरनाथ शहरातील रेशनिंग ऑफिसमध्ये नेहमीच भ्रष्टाचाराच्या तक्रारी येत असतात. 

ठळक मुद्देया प्रत्येक कार्डासाठी ५०० रुपये याप्रमाणे १५०० रुपयांची लाच मागण्यात आली होती.

अंबरनाथ: अंबरनाथमध्ये रेशनिंग विभागाचे दोन क्लार्क अँटी करप्शनच्या जाळ्यात अडकले आहेत. डुप्लिकेट रेशनकार्ड आणि ऑनलाईन नोंदणी यासाठी प्रत्येक कार्डामागे ५०० रुपयांची लाच घेताना या दोन क्लार्कना ठाणे अँटी करप्शन विभागाने रंगेहाथ बेड्या ठोकल्या. अंबरनाथ शहरातील रेशनिंग ऑफिसमध्ये नेहमीच भ्रष्टाचाराच्या तक्रारी येत असतात. 

कुठल्याही लहानमोठ्या कामासाठी पैसे मागितले जात असल्याच्या तक्रारी अनेकांनी केल्या होत्या. त्यातच जावसई भागात राहणारे शिवसेनेचे शाखाप्रमुख राजू सोमा यांनी त्यांच्या भागातील दोन जणांचे फाटलेले रेशनकार्ड नव्याने तयार करण्यासाठी, तर एक रेशनकार्ड ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी दिले होते.

या प्रत्येक कार्डासाठी ५०० रुपये याप्रमाणे १५०० रुपयांची लाच मागण्यात आली होती. खिडकी क्रमांक २ वरील क्लार्क प्रताप ब्रह्मनाद आणि खिडकी क्रमांक ३ वरील क्लार्क सुनीता हिंदळे यांनी ही लाच मागितली होती. त्यामुळे राजू सोमा यांनी याबाबत ठाणे अँटी करप्शन विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार आज सापळा रचून अँटी करप्शन विभागाने या दोघांनाही लाच घेताना रंगेहाथ अटक केली. यानंतर आता तरी अंबरनाथच्या रेशनिंग ऑफिसमधल्या भ्रष्टाचाराला आळा बसेल, अशी अपेक्षा व्यक्त होते.

 

टॅग्स :Bribe Caseलाच प्रकरणAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभागambernathअंबरनाथArrestअटकPoliceपोलिस