शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

हितेश मुलचंदानी खूनप्रकरणी दोघांना पोलीस कोठडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2019 19:06 IST

हॉटेल समोर झालेल्या किरकोळ वादातून पाच जणांनी हितेश याचे अपहरण करून त्याचा निर्घृणपणे खून केला.

ठळक मुद्देएक अल्पवयीन आरोपी ताब्यात : पिंपरी कॅम्पात कँडलमार्च 

पिंपरी :  हितेश गोवर्धन मुलचंदानी या तरुणाचा मंगळवारी (दि. २३) पिंपरीत खून झाला. हॉटेल समोर झालेल्या किरकोळ वादातून पाच जणांनी हितेश याचे अपहरण करून त्याचा निर्घृणपणे खून केला होता . याप्रकरणी पोलिसांनी आणखी दोघांना अटक केली. दोन्ही आरोपींना गुरुवारी (दि. २५) न्यायालयात हजर केले असता त्यांना मंगळवार, दि. ३० जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

यापूर्वी पिंपरी पोलिसांनी यातील एकाला ताब्यात घेतले  होते.अक्षय संजय भोसले उर्फ लिंगा (वय २५, रा. शितोळेनगर, सांगवी) व योगेश विठ्ठल टोणपे उर्फ लंगडा (वय २०, रा. पिंपळे गुरव) अशी पोलीस कोठडी सुनावण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. यापूर्वी पिंपरी पोलिसांनी एका अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतले आहे. शाहबाज सिराज कुरेशी (रा. कासरवाडी) आणि आरबाज शेख (रा. खडकी) या दोघांचा पोलीस शोध घेत आहेत. याप्रकरणी रोहीत किशोर सुखेजा (वय २६, रा. पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हितेश मुलचंदानी खून प्रकरणातील दोन आरोपी औंध येथील स्पायसर कॉलेज रोडवर येणार असल्याची माहिती पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेला मिळाली. त्यानुसार बुधवारी (दि. २४) रात्री पोलिसांनी स्पायसर कॉलेज रोड परिसरात सापळा रचून लिंगा आणि लंगडा यांना ताब्यात घेतले. गुन्ह्यात वापरलेली मोटार देखील त्यांच्याकडून जप्त केली. लिंगा आणि लंगडा दोघेही सांगवी पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. यापूर्वी पिंपरी पोलिसांनी एका अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणातील शाहबाज आणि आरबाज हे दोघेजण अद्याप फरार आहेत.

पिंपरी कॅम्पात कँडलमार्चहितेश मुलचंदानी याच्या हत्येच्या निषेधार्थ पिंपरी कॅम्पात बुधवारी (दि. २४) सायंकाळनंतर शगुन चौक ते बाबा छत्तुरामलाल मंदिर दरम्यान कँडलमार्च काढण्यात आला. यात व्यापारी, व्यावसायिक, महिला व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. पिंपरी परिसरात पोलिसांची गस्त वाढवावी, पथारीवाले, हॉटेल, आइस्क्रीम पार्लर यासह अन्य दुकानेही रात्री उशिरापर्यंत सुरू असतात. ही सर्व दुकाने वेळेत बंद करण्यात यावीत, अशी मागणी सिंधी समाजबांधवांकडून करण्यात येत आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसCourtन्यायालयMurderखून