शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

सैन्यदलात नोकरीच्या आमिषाने बेरोजगार तरुणांची कोट्यवधींची फसवणूक करणाऱ्या दोघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2020 17:38 IST

भारतीय सैन्यदलात नोकरी लावण्याचे खोटे अमिष दाखवून प्रत्येकी २ ते ४ लाख वसूल केले आहे.

ठळक मुद्देया आरोपींना न्यायालयात हजर केले असता दहा दिवसांची पोलीस कोठडी

  भिगवण : सैन्यदलात नोकरीच्या आमिषाने पुणे, सातारा, सांगली, अहमदनगर, सोलापूर, उस्मानाबाद, वर्धा, वाशीम, जळगाव तसेच मराठवाडा विदर्भ जिल्हयातील दहावी, बारावी शिक्षण झालेल्या बेरोजगार तरूणांना तेथील ओळखीचे एजंटमार्फत भारतीय सैन्यदलात नोकरी लावण्याचे खोटे अमिष दाखवून प्रत्येकी २ ते ४ लाख याप्रमाणे कोट्यावधी रुपये घेवून फसवणूक करण्यात आल्याचा धक्कादायक घटना समोर आला आहे. याप्रकरणी किशोर दादा जाधव (रा.कुरकुंभ ता.दौंड जि.पुणे) येथील तरुणाने फिर्याद दिली आहे. या फिर्यादीवरुन भिगवण पोलीस ठाण्यात आरोपी नितीन तानाजी जाधव (रा.कल्पनानगर, बारामती) व आकाश काशिनाथ डांगे (रा.भाडळी बु॥, ता.फलटण जि.सातारा) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या आरोपींना न्यायालयात हजर केले असता दहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या गुन्हयातील फिर्यादी तरुणाची सैन्यदलात नोकरीच्या आमिषाने फसवणूक झाली होती. त्याने पुणे जिल्हयाचे पोलीस अधीक्षक संदिप पाटील यांना फसवणुकीच्या प्रकाराची माहिती दिली होती. हा प्रकार गंभीर स्वरुपाचा असल्याने पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांना तात्काळ चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर तपासामध्ये फिर्यादीसह इतर अनेक बेरोजगार तरुणांची सैन्यदलात नोकरीच्या आमिषाने फसवणूक झाल्याचे व यामागे मोठे बोगस रॅकेट असल्याची माहिती समोर आली.      पोलीस अधीक्षक संदिप पाटील यांनी गुन्हा गंभीर स्वरूपाचा व त्याची व्याप्ती महाराष्ट्रभर असल्याने गुन्हयाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग केला आहे. या गुन्ह्याच्या तपासामध्ये स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुंड, महेश चव्हाण, अनिल काळे, रविराज कोकरे, महेश गायकवाड, निलेश कदम, उमाकांत कुंजीर, रौफ इनामदार, सचिन गायकवाड, सुभाष राऊत, गुरूनाथ गायकवाड, संतोष सावंत, अक्षय नवले यांनी महत्वाची कामगिरी केलेली आहे.   ................................ चारच दिवसांपूर्वी झाले युवकांना गंडा घालणाऱ्या आरोपीचे लग्न   आकाश डांगे याने अल्प कालावधीच बेरोजगार युवकांना गंडा घालून कोट्यावधी रुपयाची माया गोळा केली होती. काही वर्षांपूर्वी गरीबीत दिवस काढलेला आकाश हा फलटण पंचक्रोशीत आलिशान गाडया फिरवत पैशाची उधळण करत होता. नुकताच त्याने मोठा अलिशान बंगला बांधला होता. त्याच्याकडे एवढा पैसा अचानक कोठून आला? याची परिसरात दबक्या आवाजात चर्चा होती. परंतु हा महाठग आहे याची कोणाला कल्पनाच नव्हती. आकाश डांगे याचे चार दिवसा पूर्वीच लग्न झाले असून त्याचे गैरकृत्यामुळे त्याला पोलीस कोठडीत जाण्याची वेळ आली आहे.       

टॅग्स :PuneपुणेfraudधोकेबाजीArrestअटकPoliceपोलिसCourtन्यायालय