अरुणाचल प्रदेशात दोन जणांच्या आत्महत्येने खळबळ उडवून दिली आहे. यासंदर्भात ईटानगर राजधानी क्षेत्राचे माजी उपायुक्त (DC) टी. पोटोम यांना पोलिसांनी अटक केली आहे. दिल्ली सरकारमध्ये विशेष सचिव पदावर असलेले पोटोम यांनी आज सकाळी निरजुली पोलिस ठाण्यात आत्मसमर्पण केले, यानंतर त्यांना औपचारिकरित्या अटक करण्यात आली.
जारी करण्यात आली होती लुकआउट नोटीस -संबंधित प्रकरण उघडकीस आल्यापासूनच पोटोम बेपत्ता होते. यामुळे पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध लुकआउट नोटीस जारी केली होती. पोटोम यांच्यावर भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या विविध कलमांखाली आत्महत्येस प्रवृत्त करणे आणि गुन्हेगारीशी संबंधित आरोप आहे. हे प्रकरण २३ ऑक्टोबर रोजी आत्महत्या केलेल्या गोमचू येकर या मल्टी-टास्किंग स्टाफ (MTS) कर्मचाऱ्याच्या मृत्यूशी संबंधित आहे.
छळ आणि ब्लॅकमेलिंगचा आरोपयेकर यांच्या मृत्यूनंतर घटनास्थळी सापडलेल्या हस्त लिखित चिठ्ठीत दोन वरिष्ठ अधिकारी, पोटोम आणि कार्यकारी अभियंता लिकवांग लोवांग, यांच्याकडून आपला छळ आणि जबरदस्ती केली जात असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला होता. लोवांग यांनीही त्याच दिवशी आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
येकर यांनी सुसाईड नोटमध्ये, दीर्घकाळ लैंगिक शोषण झाल्याचे आणि अपमान, दबाव व धमक्यांमुळे आपण आत्महत्येस प्रवृत्त झाल्याचे म्हटले आहे. नोटमध्ये त्यांनी एचआयव्ही (HIV) झाल्याचा आणि एका अधिकाऱ्याने त्यांना वाऱ्यावर सोडून ब्लॅकमेल केल्याचा गंभीर आरोपही केला आहे. महत्वाचे म्हणजे, येकर यांनी दावा केला की त्यांना 1 कोटी रुपयांची आर्थिक मदत देण्याचा दावा करण्यात आला होता. मात्र तो पूर्ण केला गेला नाही. तसेच, 'जर माझा मृत्यू झाला, तर हे त्यांच्यामुळेच (पोटम) होईल. कृपया मला न्याय मिळावा," असेही नोटमध्ये म्हणण्यात आले आहे.
Web Summary : Arunachal: IAS officer T. Potom arrested after two suicides. A suicide note alleges sexual abuse, HIV, and blackmail, prompting investigation. The note implicates Potom in the death of a staff member.
Web Summary : अरुणाचल: दो आत्महत्याओं के बाद IAS अधिकारी टी. पोटम गिरफ्तार। सुसाइड नोट में यौन शोषण, HIV और ब्लैकमेलिंग का आरोप, जांच शुरू। नोट में पोटम पर कर्मचारी की मौत में शामिल होने का आरोप है।