शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

विश्रांतवाडीतील रिक्षा चालकाच्या निर्घृण खूनप्रकरणी दोन जणांना अटक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2018 15:53 IST

अनिल धोत्रे या रिक्षाचालकाचा अज्ञात इसमाने रविवारी पहाटे तीक्ष्ण हत्याराने तोंडावर वार करून निर्घृण खून केला होता .

ठळक मुद्देदोन्ही आरोपींना १२ आॅक्टोंबर पर्यंत पोलीस कोठडीगुन्ह्यात आरोपींनी वापरलेली होंडा कार जप्त

पुणे  : विश्रांतवाडी येथील शेलार घाटावर रिक्षा चालकाचा निर्घृण खून करून फरार झालेल्या दोन सराईत आरोपींना विश्रांतवाडीपोलिसांनी अटक केली. ह्या घटनेत अनिल दत्तात्रय धोत्रे या रिक्षाचालकाचा तोंडावर तीक्ष्ण हत्याराने वार करून रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास आरोपींनी खून केला होता. या खूनप्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांनी शफिक जयप्रकाश पांडे व रहमान उर्फ जाफर शेख (दोघे रा. रमाबाईनगर विश्रांतवाडी) या दोन आरोपींना अटक केली आहेत. दोन्ही आरोपींना न्यायालयाने १२ आॅक्टोंबर पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत .या गंभीर गुन्ह्यात आरोपींनी वापरलेली होंडा कार जप्त करण्यात आली आहे.वरिष्ठ पोलीस निरीक्षक संगीता पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार ,अनिल धोत्रे या रिक्षाचालकाचा अज्ञात इसमाने रविवारी पहाटे तीक्ष्ण हत्याराने  तोंडावर वार करून निर्घृण खून केला होता .खून करून आरोपी पसार झाले होते .या गंभीर खूनप्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांनी तपासासाठी पथके तैनात केली होती . मात्र हा गंभीर खून नेमका कोणता करण्यासाठी करण्यात आला ही बाब स्पष्ट नव्हती .त्यामुळे तपासात अनेक अडचणी येत होत्या .खुनाच्या घटनास्थळी शेलार घाट परिसरात उपलब्ध सीसीटीव्ही फुटेज व इतर गोपनीय माहितीवरून विश्रांतवाडी पोलिसांनी तपासाला सुरुवात केली होती .दरम्यान शेलार घाट परिसरातून दोन संशयित इसम होंडा अमेज गाडीतून गेल्याची खात्रीशीर माहिती विश्रांतवाडी तपास पथकातील कर्मचा्यांना मिळाली होती. शफिक पांडे हा शेलारघाट नजीक कैलास स्मशानभूमीत लपून बसल्याची गोपनीय माहिती विश्रांतवाडी पोलिसांना मिळाली होती .त्यानुसार तात्काळ सापळा रचून त्यांना ताब्यात घेण्यात आले.  ही कारवाई परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त प्रसाद अक्कानवरू, खडकी विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याण विधाते, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संगीता पाटील,गुन्हे निरीक्षक अशोक सायकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे प्रमुख उपनिरीक्षक अभिजीत चौगुले,पोलीस उपनिरीक्षक जीवन बोरसे, पोलीस कर्मचारी प्रवीण राजपूत, विनायक रामाणे आदींच्या पथकाने केली. 

टॅग्स :PuneपुणेVishrantwadiविश्रांतवाडीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसMurderखून