शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

लातुरात राडा करणाऱ्यांना दोघांना दोन दिवसांची पोलीस कोठडी, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2022 19:11 IST

पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लातुरातील रिंगराेडसह जुना औसा राेड परिसरात मंगळवारी रात्री एका टाेळक्याने दिसेल त्या दुचाकी, चारचाकी वाहनांवर हल्ला करत काचा फाेडल्या.

राजकुमार जाेंधळे -लातूर - येथील दादोजी कोंडदेव नगर, रिंगरोड, लक्ष्मी कॉलनी, राधाकृष्ण नगर, सद्गुरुनगर, कालिकादेवी मंदिर, जुना औसा राेड परिसरात मंगळवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास हातात धारदार शस्त्र घेऊन वाहनांची ताेडाफाेड करत, दशहत निर्माण करणाऱ्या तिघांविराेधात शिवाजीनगर पाेलीस ठाण्यात बुधवारी पहाटे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटकेत असलेल्या दाेघांना लातूरच्या न्यायालयात दुपारी हजर केले असता, न्यायालयाने त्यांना दाेन दिवसांची पाेलीस काेठडी सुनावली आहे.

पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लातुरातील रिंगराेडसह जुना औसा राेड परिसरात मंगळवारी रात्री एका टाेळक्याने दिसेल त्या दुचाकी, चारचाकी वाहनांवर हल्ला करत काचा फाेडल्या. एवढेच नाही, तर त्यांनी परिसरातील रस्त्यालगत असलेल्या दुकानांच्या काचाही फाेडल्या. हातात काेयता घेत काही जणांना धमकावत पैशाची मागणीही करण्यात येत हाेती. दरम्यान, स्थानिक नागरिकांनी यासंदर्भात पाेलिसांना माहिती दिली. पाेलीसांनी तातडीने घटनास्थळी दाखल हाेत, तिघांपैकी दाेघांच्या मुसक्या आवळल्या. 

दरम्यान, एका वाहनचालकाच्या उजव्या पायावर काेयत्याने वार केल्याने तो जखमी झाला. शिवाय, अन्य दाेघांनाही मारहाण करण्यात आली आहे. याबाबत स्वप्निल इंडे (रा. सास्तूर ता. लाेहारा जि. उस्मानाबाद) यांनी दिलेल्या तक्रारीवरुन शिवाजीनगर पाेलीस ठाण्यात अजिंक्य निळकंठ मुळे (वय २६, रा. दादाेजी काेंडदेव नगर, लातूर), संकेत ऊर्फ हन्या तावरे (वय २०, रा. लक्ष्मी काॅलनी, लातूर) आणि अन्य एकाविरुद्ध कलम ३०७, ३९४, ३२४, ३२३, ४२७, ५०४, ५०६, ३४ भादंविप्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. त्यांना लातूरच्या न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना दाेन दिवसांची पाेलीस काेठडी सुनावली आहे, असे तपास सहायक पाेलीस निरीक्षक दयानंद पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसlaturलातूर