भिवंडीत दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार; आरोपी पवनकुमार केसरवाणीला २० वर्षे सश्रम कारावास

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2026 14:10 IST2026-01-24T14:05:49+5:302026-01-24T14:10:17+5:30

अत्याचाराची घटना २०२० मध्ये घडली होती

Two minor girls raped in Bhiwandi; Accused Pawan Kumar Kesarwani sentenced to 20 years in rigorous imprisonment | भिवंडीत दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार; आरोपी पवनकुमार केसरवाणीला २० वर्षे सश्रम कारावास

भिवंडीत दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार; आरोपी पवनकुमार केसरवाणीला २० वर्षे सश्रम कारावास

लोकमत न्यूज नेटवर्क, भिवंडी: अल्पवयीन दोन मुलींवरील अत्याचार प्रकरणातील आरोपीला भिवंडी सत्र न्यायालयाने गुरुवारी २० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. अत्याचाराची घटना २०२० मध्ये घडली होती.

भिवंडी शहर पोलिस ठाणे क्षेत्रात पाच वर्षांच्या दोन मुलींवर आरोपी पवनकुमार दिनेशचंद केसरवाणी (वय ३० वर्ष रा.भाग्यनगर, कामतघर) याने अत्याचार केला होता. याबाबत २०२० मध्ये दाखल गुन्ह्याची सुनावणी भिवंडी अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायालयात न्यायाधीश एन.के. कारंडे यांच्या न्यायालयात झाली. सरकारी वकील ॲड.सी.बी. नवले आणि ॲड.व्ही.एम. मुंडे यांनी सरकारी बाजू मांडली.

भिवंडी शहर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक कृष्णदेव खराडे यांच्या मार्गदर्शनात तपास अंमलदार सेवानिवृत्त पोलिस उपनिरीक्षक अनिल पाटील, कोर्ट पैरवी अधिकारी पोलिस हवालदार अभिमन्यू पाटोळे, महिला पोलिस शिपाई ए. एस. सगाठीया, समन्स व वॉरंट बजावणारे पोलिस शिपाई मढवी व रामराजे यांनी गुन्ह्यातील पुरावे सादर केले. न्यायालयाने केसरवाणी यास २० वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. यासह ५ हजार दंड रक्कम न भरल्यास सहा महिने साध्या कारावासाची शिक्षा सुनावली.

Web Title : भिवंडी: बाल शोषण के लिए व्यक्ति को 20 साल की सजा।

Web Summary : पवन कुमार केसरवानी को 2020 में भिवंडी में दो नाबालिग लड़कियों के शोषण के लिए 20 साल की सजा मिली। भिवंडी अदालत ने पुलिस द्वारा सबूत पेश किए जाने के बाद यह फैसला सुनाया। केसरवानी पर जुर्माना भी लगाया गया है।

Web Title : Bhiwandi: Man sentenced to 20 years for child abuse.

Web Summary : Pawan Kumar Keserwani received a 20-year sentence for abusing two minor girls in Bhiwandi in 2020. The Bhiwandi court delivered the verdict after evidence was presented by police. Keserwani also faces a fine.

टॅग्स :Arrestअटक