शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

लैंगिक शोषणाच्या तक्रारीनंतर २ अल्पवयीन मुली झाल्या बेपत्ता 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2021 21:47 IST

Sexual Harassment : रविवारी एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, बेपत्ता झालेल्या मुलींचा शोध सुरू करण्यात आला आहे.

ठळक मुद्दे निवारा गृहातील (शेल्टर होम)  दोन आदिवासी मुलींनीही लैंगिक छळ व विनयभंगाची तक्रार दिली होती.

रांची: झारखंडच्या पूर्व सिंहभूम जिल्ह्यातील एका निवारा (शेल्टर होम) गृहात लैंगिक छळ केल्याच्या तक्रारी मिळाल्यानंतर शुक्रवारी संध्याकाळी दोन अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्या, तर मुलांना दुसर्‍या ठिकाणी नेण्यात आले. रविवारी एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, बेपत्ता झालेल्या मुलींचा शोध सुरू करण्यात आला आहे.निवारा गृहातील (शेल्टर होम)  दोन आदिवासी मुलींनीही लैंगिक छळ व विनयभंगाची तक्रार दिली होती. बेपत्ता झाल्याची बातमी समजताच पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केली. मदर टेरेसा वेलफेअर ट्रस्टच्या (एमटीडब्ल्यूटी) आश्रय गृहातील दोन अल्पवयीन आदिवासी मुलींनी चार वर्षांपासून लैंगिक छळ आणि विनयभंग केल्याची तक्रार दिल्यानंतर चाळीस मुलांना जमशेदपूर येथील गोबरगोसी येथील बालकल्याण आश्रमात नेण्यात आले. दोन मुली सोडल्या तर बाकी सर्व अल्पवयीन आहेत.एमटीडब्ल्यूटी स्थानिक स्वयंसेवी संस्था चालविते, ज्याचा सेंट टेरेसा यांनी स्थापन केलेली संस्था सिस्टर्स ऑफ चॅरिटीशी कोणताही संबंध नाही. पूर्व सिंहभूम वरिष्ठ पोलिस अधीक्षक (एसएसपी) डॉ. एम. तमिळ वानन म्हणाले, “बाल कल्याण समितीला असे आढळले की, ज्या नवीन निवारा गृहात आता मुलं  हलविण्यात आली आहेत तेथे फक्त ३८ मुले आहेत. सुमारे १७ वर्षाच्या म्हणजेच अल्पवयीन दोन मुली बेपत्ता आहेत. आम्ही त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न करीत आहोत.

टॅग्स :sexual harassmentलैंगिक छळSexual abuseलैंगिक शोषणJharkhandझारखंडPoliceपोलिसMissingबेपत्ता होणं