शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

भयंकर! बहिणीने संपत्तीत हिस्सा मागितल्याने भावांकडून हातोडा, हेल्मेटने बेदम मारहाण; Video व्हायरल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2021 14:50 IST

Crime News : नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. बहिणीने संपत्तीत हिस्सा मागितला म्हणून भावांकडून हातोडा आणि हेल्मेटने बेदम मारहाण करण्यात आली आहे.

संपत्तीवरून अनेकदा कुटुंबीयांमध्ये वादविवाद होत असतात. काही वाद हे टोकाला देखील जातात. अशीच एक भयंकर घटना पाकिस्तानच्या पेशावरमध्ये घडली आहे. नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. बहिणीने संपत्तीत हिस्सा मागितला म्हणून भावांकडून हातोडा आणि हेल्मेटने बेदम मारहाण करण्यात आली आहे. या मारहाणीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. याप्रकरणी दोन जणांना पोलिसांनीअटक केली आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आता हे प्रकरण समोर आलं आहे. 

स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, अब्दुल हन्नान या व्यक्तिच्या मुलांमध्ये संपत्तीवरून वाद सुरू होते. दोन्ही मुले आफताब आणि अर्षद यांनी आपल्या बहिणीला बेदम मारहाण केली. व्हायरल होणाऱ्या व्हिडिओनुसार, बहिणीने दरवाजा उघडल्यानंतर दोन्ही भावांनी बहिणीला हातोडा आणि हेल्मेटने बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. तसेच बहीण पडल्यानंतरही ते दोघे तिला मारहाण करत होते. घरातील एक वृद्ध महिला तिला वाचवण्याचा प्रयत्न करते. मात्र तिलाही धक्काबुक्की करण्यात येते. ही वृद्ध महिला त्यांची आई असल्याचं सांगण्यात येत आहे.

खैबर पख्तुनख्वा पोलिसांनी पेशावरमधील या दोन्ही आरोपींना अटक केली आहे. पोलिसांकडे आरोपींनी आपला गुन्हा कबूल केला आहे. बहिणीने संपत्तीत वाटा मागितल्याने मारहाण केली असल्याचे आरोपींनी म्हटले आहे.पीडित महिलेला वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या मारहाणीची तक्रार दाखल झाल्यानंतर दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. अशीच एक नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. एका तरुणीला तिचे वडील आणि भावाने मिळून झाडाला उलटं लटकलं आणि नंतर बेशुद्ध होईपर्यंत बेदम मारहाण केल्याचा भयंकर प्रकार समोर आला आहे. 

नात्याला काळीमा! वडील आणि भावाने तरुणीला झाडाला उलटं लटकवून बेशुद्ध होईपर्यंत केली बेदम मारहाण

मध्य प्रदेशच्या अलीराजपूरमध्ये ही संतापजनक घटना घडली. या घटनेचा एक व्हिडीओ देखील सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली. पोलिसांनी या प्रकरणी चार जणांना अटक केली आहे. जिल्हा मुख्यालयापासून जवळपास 50 किलोमीटर दूर बोरी ठाण्याजवळील एका गावात 28 जून 2021 रोजी ही धक्कादायक घटना घडली. वडिलांनी आणि भावाने मिळून तिला झाडाला उलटं लटकवलं आणि बेदम मारहाण केली. तसेच जमिनीवर आपटून देखील तिला मारहाण करण्यात आली. ती बेशुद्ध होईपर्यंत तिला मारहाण करण्यात येत असल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटकPakistanपाकिस्तान