शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

ऑपरेशन डी गॅंग अंतर्गत चौकशीनंतर छोटा शकीलच्या दोन सदस्यांना एनआयएकडून अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2022 08:53 IST

एनआयएनं अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीम याच्या डी कंपनीशी संबंधीत केलेल्या छापेमारीच्या कारवाईदरम्यान अनेक महत्त्वपूर्ण माहिती एनआयएच्या हाती लागली होती

राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीम याच्या डी कंपनीशी संबंधीत केलेल्या छापेमारीच्या कारवाईदरम्यान अनेक महत्त्वपूर्ण माहिती एनआयएच्या हाती लागली होती. सलग तिसऱ्या दिवशीही १८ जणांची एनआयएकडून चौकशी करण्यात आली होती. ईडी आणि आयबीही डी-गँगशी संबंधित सदस्यांच्या चौकशीसाठी एनआयए मुख्यालयात बुधवारी आले होते. दरम्यान, चार दिवसांच्या चौकशीनंतर छोटा शकीलच्या दोन सदस्यांना एनआयएतडून अटक करण्यात आली आहे.

चार दिवसांच्या चौकशीनंतर दाऊदचा हस्तक छोटा शकील यांच्यात पैशाचे व्यवहार आढळून आल्यानंतर दोघांना अटक केली आहे. आरिफ अबू बकर शेख आणि शकील अबू बकर शेख उर्फ ​​शब्बीर अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. हे दोघेही मुंबईतील ओशिवरा येथील रहिवासी आहेत. दोघेही डी गँगच्या टेरर फंडींगसाठी पश्चिम उपनगरातून पैसे गोळा करत होते. एनआयएचे पथक त्या दोघांना आज न्यायालयात हजर करणार आहे.नआयएकडून, सोमवारी मुंबईल्या २४ ठिकाणांसह ठाण्यातील ५ ठिकाणांवर छापे टाकण्यात आले होते. तसंच, दाऊदचा विश्‍वासू शकील शेख उर्फ छोटा शकील याचा साडू सलीम कुरेशी उर्फ सलीम फ्रुट आणि बांधकाम व्यावसायिक सोहेल खंडवानी यांच्यासह एकूण सहा जणांची चौकशी करण्यात आली होती. सलग तिसऱ्या दिवशीही या सहा जणांसह एकूण १८ जणांची एनआयएकडून चौकशी करण्यात आली. या सर्वांना गुरुवारी पुन्हा चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं. या १८ जणांमध्ये​ सलीम फ्रूट, खंडवानी, अजय गोसालिया, गुड्डू पठाण, मुनाफ शेख, अस्लम पठाणी, समीर हिंगोरिया, कय्युम शेख, आरिफ शेख आदींचा समावेश आहे. हे सर्व जण ९३ च्या बॉम्बस्फोट प्रकरणात साक्षीदार किंवा निर्दोष सुटलेले आहेत. तसंच काही जण आरोपीचे नातेवाईक, डी-गँगशी जोडलेले आहेत. तपास यंत्रणा मनी लाँड्रिंग आणि या प्रकरणातील आरोपींचे संबंध तपासण्याचा प्रयत्न करत आहेत. या प्रकरणात त्यांचे मनी ट्रेल्स आणि बँक स्टेटमेंटही तपासले जात आहेत. तसेच, राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्याशी संबंधित काही माहिती मिळते का? या दिशेनेही ईडी अधिक तपास करत आहे. 

देशभरात दहशत निर्माण करण्यासाठी बॉम्बस्फोटांचा कट दाऊद टोळीने आखला होता. लष्कर-ए-तोयबा, अल कायदा आणि जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनांच्या साहाय्याने हे स्फोट घडवून आणण्यासाठी दाऊद टोळीने मोठ्या प्रमाणात हवालाद्वारे मुंबईतून पैसा उभा करण्यास सुरुवात केली होती. त्यादृष्टीने हा तपास सुरू आहे. तर, दुसरीकडे एनआयए'ने सुहैल खंडवानी यांच्याशी संबंधित ठिकाणांवर छापे टाकत त्यांची चौकशी सुरु केली आहे. खंडवानी हे शहरातील दोन महत्त्वाच्या दर्ग्याचे विश्वस्त आहेत. पण त्याचवेळी ते राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांचा मुलगा फराझ मलिक यांच्या कंपनीत संचालक देखील आहेत. त्या दृष्टीनेदेखील तपास सुरू  आहे.

टॅग्स :NIAराष्ट्रीय तपास यंत्रणा