अक्कलकोट येथे दर्शनाला जाणाऱ्या प्रवाशी वाहनाचा धुळखेड जवळ अपघात, दोघे ठार

By रूपेश हेळवे | Updated: October 27, 2022 09:11 IST2022-10-27T09:11:06+5:302022-10-27T09:11:28+5:30

१५ जखमी : पहाटे घडली घटना

Two killed in Akkalkot passenger vehicle accident near Dhulkhed | अक्कलकोट येथे दर्शनाला जाणाऱ्या प्रवाशी वाहनाचा धुळखेड जवळ अपघात, दोघे ठार

अक्कलकोट येथे दर्शनाला जाणाऱ्या प्रवाशी वाहनाचा धुळखेड जवळ अपघात, दोघे ठार

सोलापूर : अक्कलकोट येथे दर्शनासाठी जात असलेल्या प्रवासी वाहतूक गाडीचा व उसाच्या गाडीचा अपघात झाला. यात प्रवासी वाहतूक करणाऱ्या गाडीतील दोन भक्त जागीच ठार झाले आहेत, तर पंधरा भाविक जखमी झाले आहेत. अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे. ही घटना कर्नाटकातील धुळखेड सीमेवर पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली. 

कर्नाटकामधील अंतनी येथून अक्कलकोट कडे दर्शनासाठी जात असताना गुरुवारी पहाटे हा अपघात झाला. पहाटेच्या सुमारास समोरून जाणाऱ्या उसाच्या गाडीने अचानक वाहनाचा वेग कमी केल्याने पाठीमागून प्रवासी वाहतूक करणाऱ्या गाडीची धडक बसली असे सांगितले जात आहे. हा अपघात इतका भीषण झाला होता की, गाडीमध्ये रक्ताचा सडा पडला होता. या अपघातात दोन जण ठार झाले आहेत तर पंधरा प्रवासी जखमी झाले आहेत. त्यातील दोन ठार झालेल्यांना कर्नाटकात हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे तर उर्वरित पंधरा जणांना उपचारासाठी ॲम्बुलन्स मधून छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या जखमींवर सोलापुरातील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Web Title: Two killed in Akkalkot passenger vehicle accident near Dhulkhed