शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

पुणे पुन्हा हादरले...दोन गटात तुंबळ हाणामारी, एकाचा खून तर दोघे गंभीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2023 22:17 IST

पुणे शहरातील वानवडी परिसरातील सय्यद नगर मध्ये हा संपूर्ण प्रकार घडला.

- किरण शिंदे

पुण्यातील मंगला थिएटर बाहेर दोन दिवसांपूर्वीच सराईत गुन्हेगार नितीन म्हस्के याची दहा ते बारा जणांनी अतिशय निर्घृणरीत्या हत्या केली होती. या हत्याकांडातील आरोपी पकडले जात नाहीत तोपर्यंत पुण्यात आणखी एकाचा खून करण्यात आलाय.आजीम शेख उर्फ अंत्या असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. अजीम शेख हा पुणे पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचीही माहिती समोर येते.. इतकच नाही तर पोलिसांनी त्याला तडीपार केले आहे.

पुणे शहरातील वानवडी परिसरातील सय्यद नगर मध्ये हा संपूर्ण प्रकार घडला. दोन गटात तुंबळ हाणामारी झाली आणि त्यातूनच आजीम शेख चा खून करण्यात आलाय.. प्राथमिक माहितीनुसार अजीम शेख आणि विरुद्ध गटामध्ये घरगुती कारणावरून वाद भडकला.. आणि त्यानंतर दोन्ही गट आमने-सामने आले.. दोन्ही गटात तुंबळ हाणामारी झाली.. आणि या हाणामारीत गंभीर जखमी झालेल्या अझीमचा मृत्यू झाला.. तर इतर दोघेजण गंभीर जखमी झाले असून हल्लेखोरांनी या दोघांची बोटे छाटली अशी माहिती देखील समोर येत आहे...

दरम्यान घटनेची गंभीरता पाहता स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ही घटनास्थळी धाव घेतली आहे. गुरुवारी रात्रीच्या सुमारास हा संपूर्ण प्रकार घडला.. पुणे पोलिसात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारी