शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

पोलिस भरती क्लासमध्ये दोन मुलींचे लैंगिक शोषण; पोलिसच करायचा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2023 08:14 IST

पीडितांच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल, मैत्रिणीसह पोलिसाला अटक

लोकमत न्यूज नेटवर्कनालासोपारा : पोलिसांकडूनच अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार नालासोपाऱ्यात उघडकीस आला आहे.  लैंगिक शोषण करणारा पोलिस हा नालासोपारा येथे पोलिस प्रशिक्षण क्लास चालवत होता. दोन पीडित मुलींनी पोलिसांत तक्रार दिली. त्यानुसार क्लास चालवणारा पोलिस आणि त्याच्या मैत्रिणीविरोधात विनयभंग, तसेच पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दोघांना अटक केली.

आरोपी समाधान गावडे (२८) आणि त्याची २५ वर्षीय मैत्रीण वसई रेल्वे पोलिस ठाण्यात कार्यरत आहेत. गावडे हा नालासोपारा येथे विजयी भव नावाची पोलिस अकादमी चालवतो. त्याच्यावर क्लासेसला येणाऱ्या मुलींचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे.  

आरोपी गावडे हा मुलींना अश्लील मेसेजेस पाठवत होता. तसेच व्हिडीओ कॉल करून अश्लील कृत्य करत होता. शिकविण्याच्या नावाखाली गावडे हा मुलींच्या अंगाला चुकीच्या ठिकाणी स्पर्श करीत असे. अनेकदा मुलींचा पाठलाग करत त्यांच्या घरी जायचा. तर काही वेळा त्यांना फिरायला बोलवत होता. त्याच्या मैत्रिणीने या कृत्याला पाठिंबा दिल्याचा आरोप आहे. तिने एका पीडित मुलीचे व्हॉट्सॲप स्कॅन करून आरोपी गावडेबरोबर आक्षेपार्ह संभाषण केले होते. या प्रकारामुळे पीडित मुलींनी क्लासमध्ये जाणे बंद केेले. बुधवारी नालासोपारा पोलिस ठाण्यात आरोपी पोलिस समाधान गावडे आणि त्याची मैत्रीण या दोघांविरोधात विनयभंग, बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम २०२२ च्या (पोक्सो) तसेच माहिती तंत्रज्ञान (सुधारणा) अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

पीडित मुलींच्या जबाबानंतर आरोपींवर गुन्हा दाखल करून अटक केली आहे. गुरुवारी त्यांना न्यायालयात हजर केल्यावर दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. - विलास सुपे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, नालासोपारा पोलिस ठाणे

टॅग्स :MolestationविनयभंगPoliceपोलिस