उल्हासनगरात दोन तडीपार गुंडांना अटक!

By सदानंद नाईक | Updated: October 12, 2022 18:46 IST2022-10-12T18:44:04+5:302022-10-12T18:46:57+5:30

उल्हासनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारा कुलदीप उर्फ भोला मुकेश कनोजिया या गुंडाला मुंबई, उपनगरे, ठाणे व रायगड जिल्हयातील कर्जत, पनवेल तालुक्यातून हद्दपार कारवाई केली.

Two gangsters arrested in Ulhasnagar! | उल्हासनगरात दोन तडीपार गुंडांना अटक!

उल्हासनगरात दोन तडीपार गुंडांना अटक!

उल्हासनगर : विठ्ठलवाडी व उल्हासनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या दोन गुंडावर तडीपारीची कारवाई करण्यात आली. मात्र हद्दपार कारवाईचा भंग करून शहरात राहणाऱ्या दोघांनाही पोलिसांनी अटक केली. 

उल्हासनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारा कुलदीप उर्फ भोला मुकेश कनोजिया या गुंडाला मुंबई, उपनगरे, ठाणे व रायगड जिल्हयातील कर्जत, पनवेल तालुक्यातून हद्दपार कारवाई केली. मंगळवारी सकाळी ११ वाजता शहाड फाटक येथे पोलिसांना कनोजिया मिळून आला असून त्याला अटक करून गुन्हा दाखल केला. तसेच विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारा उपेंद्र उर्फ उप्पी लिंगप्पा याच्यावरही हद्दपारीची कारवाई केली होती. 

मंगळवारी दुपारी ३ वाजण्याच्या दरम्यान वॉटर सप्लाय सिद्धार्थनगर येथे पोलिसांना आढळून आला. पोलिसांनी त्याला हद्दपारीचा भंग केल्या प्रकरणी अटक करून गुन्हा दाखल केला. शहरातून हद्दपारीची कारवाई केलेले गुंड शहरातच ठाण मांडून बसल्याची चर्चा शहरात सुरू असताना पोलिसांनी दोघा हद्दपार गुंडावर कारवाई केली आहे.

Web Title: Two gangsters arrested in Ulhasnagar!

टॅग्स :Arrestअटक