दोन औषध विक्रीच्या एजन्सी फोडल्या; २५ हजाराची रोख रक्कम लंपास
By भगवान वानखेडे | Updated: August 24, 2022 14:39 IST2022-08-24T14:38:12+5:302022-08-24T14:39:16+5:30
हा प्रकार २४ ऑगस्ट रोजी उघडकीस आला. याप्रकरणी आसिम शेख यांनी तक्रार दिली असून, शहर पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

दोन औषध विक्रीच्या एजन्सी फोडल्या; २५ हजाराची रोख रक्कम लंपास
बुलढाणा : शहरातील सुवर्ण नगर परिसरातील औषध विक्रीच्या एजन्सी २३ ऑगस्टच्या मध्यरात्री अज्ञात चोरट्या फोडल्या. हा प्रकार २४ सप्टेंबर रोजी उघडकीस आला असून, याप्रकरणी दिलेल्या तक्रारीवरुन शहर पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
शहरातील सुवर्ण नगर भागात असलेल्या फार्मा ट्रेडलिंक ॲंड सर्जिकल मेडिकल एजेंसी, आणि डिस्ट्रीब्यूशन मेडिकल एजेंसीमध्ये २३ ऑगस्टच्या मध्यरात्री अज्ञात चोरट्याने प्रवेश करुन एजन्सीमधील रोख २५ हजार रुपये चोरुन नेले. हा प्रकार २४ ऑगस्ट रोजी उघडकीस आला. याप्रकरणी आसिम शेख यांनी तक्रार दिली असून, शहर पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
फॉरेन्सिक टीम घटनास्थळावर!
तक्रार दाखल होताच पोलिसांनी पंचनामा केला. तर यावेळी ठसे तज्ज्ञांनाही पाचारण करण्यात आले होते. त्यांनी एजन्सीमधील ठसे घेतले असून, पोलिसांनी सीसी कॅमेऱ्यांची तपासणी केली.