शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

५ वर्षांपासून फरार असलेल्या ‘समृद्ध जीवन’च्या दोन संचालकांना अटक; सीआयडीची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2020 17:43 IST

गुंतवणुकदारांना कमी वेळेत मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून या कंपनीमध्ये गुंतवणुक करण्यास भाग पाडले.

ठळक मुद्देन्यायालयाने अधिक तपासासाठी ७ दिवसांची पोलीस कोठडी या गुन्ह्यात एकूण २५ आहेत आरोपी

पुणे : 'समृद्ध जीवन फूडस इंडिया' कंपनीने केलेल्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात राज्य गुन्हे अन्वेषणने (सीआयडी) गेल्या ५ वर्षांपासून फरार असलेल्या दोघा संचालकांना अटक केली आहे. ऋषीकेश वसंत कणसे (वय ३०) आणि सुप्रिया वसंत कणसे (वय ३६, रा. पुणे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. या कंपनीने ३ हजार ७०० कोटी रुपयांची फसवणुक केली आहे. त्यांना गुरुवारी विशेष न्यायालयात हजर केले असताना न्यायालयाने अधिक तपासासाठी ७ दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली आहे. समृद्ध जीवन फूडस इंडिया व समृद्ध जीवन मल्टी स्टेट मल्टी पर्पजच्या को़ ऑप़सोसायटी कपंनीच्या आर्थिक गैरव्यवहारासंदर्भात राज्यात ४ गुन्ह्यांचा तपास सीआयडी करीत आहेत. या कंपन्यांविरोधात देशातील अनेक राज्यात गुन्हे दाखल असून गुन्हा दाखल झाल्यापासून हे संचालक फरार होते. कंपनीने पशुधन विक्री, संगोपन व खरेदी पुन्हा खरेदी यासारख्या विविध आकर्षक, उच्च परतावा देणाऱ्या गुंतवणुक योजना सुरु केल्या. त्याकरीता प्रचंड कमिशनवर एजंटची (१२ टक्के) नेमणूका केल्या. विविध सेलिब्रिटींना आमंत्रित केले. गुंतवणुकदारांना कमी वेळेत मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून गुंतवणुक करण्यास भाग पाडले. या गुन्ह्यात एकूण २५ आरोपी आहेत़ त्यात मुख्य आरोपी महेश मोतेवार, वैशाली मोतेवार, लिना मोतेवार, प्रसाद पारसवार, सुवर्णा मोतेवार, अभिषेक मोतेवार, विशाल चौधरी व इतर आरोपींना यापूर्वीच अटक करण्यात आलेली आहे.  

राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे तपासात या कंपन्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे गैर बँकिंग कंपन्या म्हणून नोंदणीकृत नसल्याचे व कंपनीला ठेवी जमा करण्याचे कोणतेही अधिकार नसल्याचे निष्पन्न झाले आहे. सीआयडीकडे तपासाला असलेल्या ४ ही गुन्ह्यात दोषारोपपत्र यापूर्वीच न्यायालयात दाखल करण्यात आले आहे. अपर पोलीस महासंचालक अतुलचंद्र कुलकर्णी, आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपमहानिरीक्षक डॉ. जालिंदर सुपेकर, पोलीस अधीक्षक संदीप दिवाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक उत्तम वाळके, निरीक्षक शैलजा बोबडे, वनिता धुमाळ, हवालदार बाजीराव कुंजीर, प्रशांत पवार, राहुल कदम, निनाद माने, भूषण पवार व कविता नाईक यांनी ही कामगिरी केली.़़़़़़़़़़३ हजार ७०० कोटींची फसवणूकसमृद्ध जीवन फूडस इंडिया या महेश मोतेवार यांच्या कंपनीने देशभरातील विविध राज्यांमध्ये कमिशन एजंट नेमून त्यांच्याकडून गुंतवणुकदार/ ठेवीदारांना अधिक व्याजाचे अमिष दाखवून कोट्यावधींच्या ठेवी स्वीकारल्या व कोणतीही रक्कम परत न करता अंदाजे ३ हजार ७०० कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कमेचा अपहार केला आहे. या गुन्ह्यात आतापर्यंत २३३ कोटी ३३ लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली असून आरोपीकडून इतर मालमत्ता जप्त करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

टॅग्स :PuneपुणेfraudधोकेबाजीCrime Newsगुन्हेगारीArrestअटक