शहरं
Join us  
Trending Stories
1
पडघम वाजले; मात्र प्रत्यक्ष बंधुऐक्य दूरच; उद्धव ठाकरेंना हवीय इंडिया आघाडीची बैठक...
2
म्हाडाने घर विक्रीसाठी प्रतिनिधी नेमलेले नाहीत; ५,२८५ घरांसाठी नोंदणी सुरू; १३ ऑगस्टपर्यंत करा अर्ज 
3
आजचे राशीभविष्य, १५ जुलै २०२५: नकारात्मक वृत्ती दूर ठेवल्याने आर्थिक लाभ होईल
4
दीड महिना झाला... भोलानाथ, सांग पाऊस कधी येणार! शहर, उपनगरात हजेरी; मात्र मोठ्या पावसाची प्रतीक्षा
5
शिवसेना, धनुष्यबाण कुणाला मिळणार? आता फैसला महापालिका निवडणुकीपूर्वी 
6
संपादकीय: रयतेच्या राजाचा वारसा! आपल्याला तरी समजला आहे का?
7
कुचकामी कायदा, बनावट प्रमाणपत्रे आणि खोटे दिव्यांग; पूजा खेडकर एकटी नाही...
8
बोइंग विमानांची इंधन लॉकिंग प्रणाली तपासा; अहमदाबाद विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालानंतर डीजीसीएची सूचना
9
नवीन शिक्षण धोरणानुसार राज्यातील पुस्तके टप्प्याटप्प्याने बदलणार!
10
दूध उत्पादक शेतकऱ्यांवर अमेरिकी संकट; दर घसरण्याची शक्यता
11
डम्पिंगप्रकरणी ठाणे पालिकेला १० कोटी दंड; महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई
12
पशुपती राजू गोव्याचे तर असीमकुमार घोष हरयाणाचे राज्यपाल
13
निवडणुकीआधी हत्यांमध्ये वाढ; बिहार हादरले, पोलिसांचा दावा काय...
14
नागरिकांना भाषण, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची किंमत माहीत असायला हवी : सर्वोच्च न्यायालय
15
गुप्तपणे केलेले फोन रेकॉर्डिंग घटस्फोटाच्या खटल्यात कायदेशीर पुरावा मानता येईल
16
‘मोसाद’चे धाडसी ऑपरेशन्स आणि त्याची खासियत काय?
17
इंजिनिअरिंगच्या प्रवेशासाठी यंदा विक्रमी विद्यार्थी नोंदणी 
18
मुंबईकरांच्या स्वप्नातील मोठ्या घराचे स्वप्न साकारणार : मुख्यमंत्री
19
राज्यात १० ऑटोमेटेड ड्रायव्हिंग टेस्ट ट्रॅक
20
प्रतिभा अमेरिकेबाहेर पडते आहे? - वेलकम टू इंडिया!

पत्नीसह दोन मुलींना पेट्रोल ओतून जाळले, तिघींचाही झाला कोळसा; पतीला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2024 09:02 IST

पत्नी ललिता उर्फ ताराबाई सुनील लांडगे (३२), मुलगी साक्षी सुनील लांडगे (१४), खुशी सुनील लांडगे (१३ महिने), अशी मयत झालेल्यांची नावे आहेत. मयत ललिता यांचे वडील भाऊसाहेब गोरे यांनी फिर्याद दिली. 

अहमदनगर : चारित्र्यावर संशय घेत पत्नीसह दोन अल्पवयीन मुलींना पेट्रोल टाकून जिवे मारल्याची घटना सोमवारी सकाळी पिंपळगाव लांडगा (ता. नगर) येथे घडली. पतीने दारूच्या नशेत हे कृत्य केल्याचा  संशय आहे. पती सुनील गोरख लांडगे याला पोलिसांनी अटक केली आहे.    पत्नी ललिता उर्फ ताराबाई सुनील लांडगे (३२), मुलगी साक्षी सुनील लांडगे (१४), खुशी सुनील लांडगे (१३ महिने), अशी मयत झालेल्यांची नावे आहेत. मयत ललिता यांचे वडील भाऊसाहेब गोरे यांनी फिर्याद दिली. सोमवारी सकाळी सुनील लांडगे याने पत्नी व दोन मुलींना घरात कोंडून त्यांच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून दिले. आग एवढ्या मोठ्या प्रमाणात भडकली होती की, कुणाला तिथे जाणे शक्य होत नव्हते. त्यामुळे अग्निशमन विभागाला पाचारण केले. अग्निशमन विभागाने आग नियंत्रणात आणत घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला असता आई व दोन मुली जळालेल्या अवस्थेत आढळल्या.  

मुलीकडे गेलो तेव्हा धक्का बसला...  घटनेपूर्वी सोमवारी आरोपी सासऱ्यांच्या घरी आला. तो म्हणाला की, पत्नी व दोन मुलींना घरात कोंडून आलो. घराची चावी तुमचा मुलगा गणेशकडे दिली आहे. तुम्हीच जाऊन कुलूप उघडा नाही तर तिच्यासह मुलींना फुकून टाकीन. त्यामुळे सासरे सोमवारी सकाळी मुलीच्या घरी गेले. तेव्हा त्यांच्यासमोरच  जळालेल्या अवस्थेतील मुलगी व नातींना घरातून बाहेर काढण्यात आले.

‘भरोसा सेल’मध्ये केली होती तक्रार  सुनील हा मुलीला वारंवार मारहाण करत असल्याने ‘भरोसा सेल’मध्ये तक्रार केली होती. पोलिसांनी त्याला बोलावून घेऊन समजावून सांगितले होते. त्यानंतर तो मुलीला घेऊन गेला; पण पाच ते सहा दिवसांनी पुन्हा मुलीला मारहाण केली व दोन्ही मुलींना मारण्याची धमकी दिली होती.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी