शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मीरा रोडमध्ये भरदिवसा ज्वेलर्सवर दोन कोटींचा दरोडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2021 05:51 IST

चारही दरोडेखोरांचे पलायन : घटनेमुळे शहरात उडाली खळबळ 

लोकमत न्यूज नेटवर्कमीरा रोड : मीरा रोडच्या शांतीनगरमधील एस. कुमार या ज्वेलर्सवर गुरुवारी दुपारी चौघा दरोडेखोरांनी शस्त्राचा धाक दाखवून दरोडा घातला. सुमारे दोन कोटींचे दागिने लुटून त्यांनी पोबारा केला.

गुरुवारी दुपारी दोनच्या सुमारास दुकानातील काही कर्मचारी जेवायला बसले होते, तर काही कर्मचारी काउंटरजवळ उभे होते. त्या वेळी दोन दुचाकींवरून आलेले चौघे दरोडेखोर हे ग्राहक म्हणून दुकानात आले. चौघांनी दागिने खरेदी करायचे म्हणून कर्मचाऱ्यांना दागिने दाखवायला सांगितले. कर्मचाऱ्यांनी त्यांना दागिने काढून दाखवले. खरेदी केलेल्या दागिन्यांचे पैसे मागितले असता चौघांपैकी दोघांनी अग्निशस्त्रे काढली. पिस्तुलाचा धाक दाखवून चौघांनी शोकेसमधील दागिने बॅगेत भरले व बाहेर आले. दरोड्याच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून नयानगर पोलिसांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. 

पोलिसांनी या प्रकरणी दरोड्याचा गुन्हा दाखल केला असून दुकानातील सीसीटीव्ही फुटेज आणि दुचाकीच्या क्रमांकावरून दरोडेखोरांचा तपास सुरू केला आहे. पोलीस आयुक्तालय झाल्यानंतरची दरोड्याची शहरातील ही पहिलीच घटना आहे. 

या दरोड्यात हिरे, पांढरे सोने व सोन्याचे सुमारे दोन कोटींचे दागिने दरोडेखोरांनी लुटून नेल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.दुकानदार आणखी किती दागिने दरोडेखोरांनी लुटले याची पडताळणी करून त्याची माहिती पोलिसांना देणार आहे. 

चेहरे ओळखणे अवघडn दरोडेखोर हे मास्क घालून आलेले होते. त्यामुळे सीसीटीव्ही फुटेज मिळून देखील त्यांचे चेहरे ओळखणे अवघड जात आहे. n दरोडेखोर सहजपणे वावरत असल्याने त्यांनी दुकानाची माहिती काढल्याची शक्यता आहे. दोन दरोडेखोरांनी दुचाकी सुरू न झाल्याने ती तशीच टाकून गेले होते. पोलिसांनी त्या दुचाकीची माहिती घेतली असता ती नालासोपारा येथील असल्याचे सकृतदर्शनी समोर आले आहे.

टॅग्स :theftचोरीPoliceपोलिस