शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

येरवडामधील तात्पुरत्या कारागृहातून दोन कोरोना पॉझिटिव्ह कैद्यांचे पलायन  

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2020 10:19 AM

अनिल वेताळ याला मारहाण करुन लुट केल्याचा गुन्ह्यात शिक्रापूर पोलिसांनी अटक केली आहे. तर, विशाल खरात याला खुनाचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यात चिखली पोलिसांनी अटक केली होती.

पुणे - जबरी चोरी आणि खुनाचा प्रयत्न अशा गंभीर गुन्ह्यात न्यायालयीन कोठडीत असलेले व कोरोना पॉझिटिव्ह असलेले दोन कैद्यांनी पहाटे येरवडा तात्पुरत्या कारागृहातून पलायन केले आहे. अनिल विठ्ठल वेताळ (वय २१, रा. गणेशनगर, भीमा कोरेगाव, ता. शिरुर) आणि विशाल रामधन खरात (रा. समर्थ सोसायटी, निगडी) अशी पळून गेलेल्या दोघा कैद्यांची नावे आहेत. अनिल वेताळ याला मारहाण करुन लुट केल्याचा गुन्ह्यात शिक्रापूर पोलिसांनी अटक केली आहे. तर, विशाल खरात याला खुनाचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यात चिखली पोलिसांनी अटक केली होती. पोलीस कोठडीची मुदत संपल्यावर त्यांना येरवडा तात्पुरत्या कारागृहात ठेवण्यात आले होते. तेथे ठेवताना केलेल्या चाचणीत दोघेही कोरोना पॉसिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले होते. या कारागृहातील बिल्डिंग क्रमांक ४ मधील पहिल्या मजल्यावरील रुममध्ये त्यांना ठेवण्यात आले होते. आज पहाटे हे दोघेही सर्वांची नजर चुकवून पळून गेले. या तात्पुरत्या कारागृहाच्या सुरक्षेचे तीन तेरा वाजले आहेत. आतापर्यंत अनेक कच्चे कैदी या कारागृहातून पळून गेले आहेत. पोलिसांनी त्यांचा शोध घेऊन त्यापैकी काही जणांना पुन्हा अटक केली आहे.मात्र, इतरांपेक्षा या दोघांची केस वेगळी आहे. हे दोघेही कोरोना पॉझिटिव्ह असल्याने ते जेथे जेथे जातील तेथे इतरांना कोरोनाचा संसर्ग पोहचविण्याची शक्यता आहे. त्यामुळे ते दोघे बाहेर राहणे धोकादायक ठरु शकते. या दोघांचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घ्यावे व येरवडा पोलीस ठाण्याची संपर्क साधावा, असे आवाहन येरवडा पोलिसांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांना केले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPuneपुणे