ठाणे : पूर्वीच्या वादातून अकिब हकीम आणि हिजाब खान या दाेन बारावीच्या परीक्षार्थींवर शनिवारी दुपारी २ वाजता ठाण्याच्या सावरकरनगर भागात तरुणांच्या एका गटाने चाॅपरने हल्ला केल्याची घडली. याप्रकरणी चार ते पाच जणांच्या टाेळीविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून त्यांचा शाेध घेण्यात येत असल्याची माहिती वर्तकनगर पाेलिसांनी दिली.अकिब, हिजाब आणि त्यांच्यावर हल्ला करणारे टाेळके हे सर्वजण पूर्वी ठाण्याच्या वागळे इस्टेट पडवळनगर भागात वास्तव्याला हाेते. त्यांच्यात पूर्वीपासून किरकाेळ वाद आहेत. हा वाद आज पुन्हा उफाळून आला. बारावीचा पेपर दिल्यानंतर अकिब आणि हिजाब हे दाेघेही सावरकरनगर येथील ज्ञानाेदय शाळेतून बाहेर पडले. त्यावेळी चार ते पाच जणांच्या एका टाेळक्याने त्यांना गाठले. त्यांच्यात वादावादी झाल्यानंतर या दाेघांवरही टाेळक्याने चाॅपरने हल्ला केला. दाेघेही या हल्ल्यात गंभीर जखमी झाले. त्यांना ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. हल्लेखाेराचां शाेध घेण्यात येत असल्याचे पाेलिसांनी सांगितले.
पूर्वीच्या वादातून ठाण्यात बारावीच्या दाेन परीक्षार्थ्यांवर चाॅपरने हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2026 00:43 IST